देश लुटणाऱ्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जमाफी, आरबीआयचा पराक्रम उघड

साम टीव्ही
बुधवार, 29 एप्रिल 2020

कर्जमाफीसंबंधी एक मोठा घोटाळा समोर आलाय. माहिती अधिकारातून जी धक्कादायक बाब समोर आलीय, ती पाहून तुम्हालाही चीड येईल

कर्जमाफीसंबंधी एक मोठा घोटाळा समोर आलाय. माहिती अधिकारातून जी धक्कादायक बाब समोर आलीय, ती पाहून तुम्हालाही चीड येईल

एकीकडे देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलन करावी लागत असताना दुसरीकडे देशाची शिखर बँक असलेल्या आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातल्या बड्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज माफ केलीयेत. 
यामध्ये अनेक बँकांची कर्ज बुडवून परदेशी परागंदा झालेल्या मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्ल्यांसारख्या डिफॉल्टर उद्योगपतींचा देखील समावेश आहे. माफ करण्यात आलेल्या कर्जाची एकूण किंमत तब्बल ६८ हजार ६०७ कोटींच्या घरात आहे. ३० सप्टेंबर २०१९पर्यंतची ही कर्जाची रक्कम आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरातून थेट रिझर्व्ह बँकेकडूनच याची माहिती देण्यात आलीय. 
मेहुल चोक्सीच्या गितांजली जेम्स लिमिटेडचं 5 हजार 492 कोटींचं कर्ज माफ करण्यात आलंय. तर  मेहुल चोक्सीच्याच इतर कंपन्यांपैकी गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांचीही अनुक्रमे १ हजार ४४७ कोटी आणि १ हजार १०९ कोटींची कर्ज माफ करण्यात आली आहेत. यादीमध्ये सर्वात शेवटी लंडनमध्ये फरार झालेला किंगफिशरचा मालक विजय माल्ल्याचं 1 हजार 943 कोटींचं कर्ज माफ असल्याचीही माहिती मिळतेय.
देशाला फसवून, लुटून पळालेल्या उद्योगपतींची कर्ज या यादीत माफ करण्यात आली असल्याचं दिसतंय. ही कर्जमाफी देशातील सर्व बँकांची शिखर बँक असणाऱ्या आरबीआयनं केली आहेत. आरबीआयची मेहेरबानी या उद्योगपतींवर कोणाच्या सांगण्यावरुन झाली याची आता चर्चा रंगलीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live