बुलढाण्यात हजारो शेतकरी बियाणे मिळण्याच्या प्रतीक्षेत

संजय जाधव
बुधवार, 2 जून 2021

शेवटी कृषी अधीक्षकांना पाचारण करून शेतकऱ्यांना बियाणे महामंडळाकडे मुबलक बियाणे असून त्याच वाटप केलं जाईल असं सांगितल्यावर शेतकरी शांत झाले.

जिल्ह्यात आज लॉकडाऊन (Lockdown) नियमातून थोडीफार शिथिलता मिळाल्यावर हजारो शेतकऱयांनी बियाणे महामंडळाच्या कार्यलयाबाहेर बियाणे (Seeds) घेण्यासाठी एकच गर्दी केली होती , यामुळे बियाणे महामंडळाचं नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून आले.  त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याचं चित्र आज बुलढान्यात दिसून आले. बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची जवळपास एक किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. त्यामुळे कोरोनाचे नियमांचा फज्जा उडाला आहे.(Thousands of farmers in Buldhana wait for seeds)

बुलढाणा जिल्ह्यात आज कुठे कोरोनाच्या (Coronavirus) व लोकडाऊनच्या नियमांतून थोडीफार शिथिलता मिळाल्यावर व आगामी खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या कार्यालया समोर हजारो शेतकऱ्यांनी बियाणे मिळविण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी बियाणे कमी असल्याने सर्वांना ते मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली होती.

हे देखील पाहा

शेवटी कृषी अधीक्षकांना पाचारण करून शेतकऱ्यांना बियाणे महामंडळाकडे मुबलक बियाणे असून त्याच वाटप केलं जाईल असं सांगितल्यावर शेतकरी शांत झाले.

तोल ढासळणाऱ्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टीका   

पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उभे केले, कोरोनाची परिस्थितीत सरकारने अगोदरच बियाण्यांचे नियोजन्य करायला पाहिजे होते ते केले नसल्याने गोंधळ होणारच त्यांमुळे सरकारने तात्काळ राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने बियाने उपलब्ध करुण वाटप करावे अन्यथा पेरणीपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा तुपकर यानी दिला आहे. 

Edited By : Pravin Dhamale


संबंधित बातम्या

Saam TV Live