बीडमध्ये एचआरसीटी केंद्राकडून अव्वाच्या सव्वा लूट; वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलनाचा इशारा 

विनोद जिरे
मंगळवार, 18 मे 2021

बीडमध्ये एचआरसीटी HRTC केंद्राकडून सर्वसामान्य नागरिकांची अव्वाच्या सव्वा लूट केली जात आहे. यामुळे आता वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi आक्रमक झाली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  Collector याविषयीची तक्रार देखील केली आहे.

बीड : बीडमध्ये एचआरसीटी HRTC केंद्राकडून सर्वसामान्य नागरिकांची अव्वाच्या सव्वा लूट केली जात आहे. यामुळे आता वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi आक्रमक झाली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  Collector याविषयीची तक्रार देखील केली आहे. Thousands of rupees have been asking for a test of HRCT center in Beed

हे देखील पहा -

केलेल्या तक्रारीत म्हटले गेलं आहे की, कोरोनाच्या पेशंटसाठी शासनाने दर निश्चित केले असताना, युनिट सिटीस्कॅन सेंटरचे संचालक हे इतर डॉक्टर कडून रेफर पेशंट आल्यास नियमाप्रमाणे 2500 हजार रुपये शुल्क घेतात. मात्र जे पेशंट स्वतः येतात त्याच्याकडून 4 हजार एवढे शुल्क घेतले जात असून  हे नियम बाह्य आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याचा पोलिसांवर हल्ला, चौघे जखमी  

दरम्यान अशाप्रकारे ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणावर लूट या युनिट सिटी स्कॅन सेंटर च्या माध्यमातून होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ या एचआरसिटी केंद्रावर कारवाई करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन Agitation करण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर Shivraj Bangar यांनी दिला आहे.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live