BREAKING | मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी? चार वेळा आले धमकीचे फोन

साम टीव्ही
रविवार, 6 सप्टेंबर 2020

मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून  मातोश्रीवरील लॅडलाईनला फोन कॉल कोणी केलेत. याचा आता तपास  राज्य गुप्तचर विभाग आणि सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.शिवाय मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. एक दोन नव्हे तर धमकीचे तब्बल चार कॉल मातोश्रीवर आल्याचं समजतंय. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचा दावा केलाय.

मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून  मातोश्रीवरील लॅडलाईनला फोन कॉल कोणी केलेत. याचा आता तपास  राज्य गुप्तचर विभाग आणि सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.शिवाय मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

मातोश्री बाहेरील सुरक्षेचा आढावा खालील व्हिडिओतून...

संबंधित बातम्या

Saam TV Live