मानवजातीला आणखी एका जिवघेण्या व्हायरसपासून धोका, जग करणार नष्ट

साम टीव्ही
मंगळवार, 2 जून 2020
  • मानवजातीला आणखी एका जिवघेण्या व्हायरसपासून धोका
  • एपोकॅलिक व्हायरस जगाला नष्ट करणार ?
  • ऑस्ट्रेलियन संशोधकाचा जगाला इशारा

कोरोना व्हायरसची जग झुंजतंय. पण याहीपेक्षा आणखी एका खतरनाक व्हायरसचा जगाला धोका असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. कोणता आहे हा व्हायरस?वाचा...

कोरोनाशी जग झुंजतय, कोरोनावर लस मिळालेली नाही अशातच आणखी एका व्हायरसचा धोका मानवजातीला असण्याची शक्यता आहे. पोल्ट्री फार्ममध्ये तयार होणारा एपोकॅलिक व्हायरस अर्ध्या जगाला नष्ट करु शकतो, अशी भीती ऑस्ट्रेलियन संशोधक मायकल ग्रेगरनं वर्तवलीय. कोरोनापेक्षाही एपोकॅलिक व्हायरस जिवघेणा ठरु शकतो, असा दावा ग्रेगर यांनी केलाय.

जगाला आपल्या खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलाव्या लागतील, अन्यथा एकामागोमाग एक व्हायरस जन्म घेतील अशी भीती ऑस्ट्रेलियन संशोधक ग्रेगर यांनी वर्तवलीय. कोरोनाच्या आधी ज्याप्रमाणे जग होतं, तसंच जग आपल्याला परत पाहायचं असेल तर आपल्या राहणीमानात अनेक बदल आपल्याला करावे लागतील. आशा करुयात की माणूस कोरोनापासून धडा घेईल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live