'रामदास आठवले यांच्यापासून जीवाला धोका'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

अंबरनाथ : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला करणारा तरुण प्रवीण गोसावी याची अखेर अडीच महिन्यांनंतर कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याने रामदास आठवले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली.

प्रवीण गोसावी हा आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडीचा पदाधिकारी होता. मात्र, पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्याने पक्षाला रामराम ठोकला. यानंतर 8 डिसेंबर रोजी अंबरनाथमध्ये झालेल्या रामदास आठवलेंच्या सभेत त्याने आठवलेंवर हल्ला केला. यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती. तेव्हापासून गोसावी या आधारवाडी तुरुंगात होता. तब्बल अडीच महिन्यांनंतर गोसावी याची सुटका झाली आणि त्यानंतर त्याने आपली बाजू स्पष्ट केली.

रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची मतं घेतात. मात्र, घरोबा आरएसएससोबत करतात. त्यामुळे आंबेडकरी युवक म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल राग असल्याचं गोसावी म्हणाला. तसेच आता आठवले आणि त्यांचे समर्थक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही त्याने व्यक्त केली.

Web Title: threatens to My life from Ramdas Athawale a youth said

संबंधित बातम्या

Saam TV Live