लशीसाठी राजकीय नेत्यांकडून धमक्या, ‘सीरम'चे सीईओ आदर पूनावाला यांचा खुलासा

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

कोव्हिशिल्ड लशीचा पुरवठा करण्यासाठी भारतातील अनेक राजकीय नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक खुलासा सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी ब्रिटनमधील ‘द टाइम्स' वर्तमानपत्रास दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

नवी दिल्ली - कोव्हिशिल्ड Covishield लशीचा Vaccine पुरवठा करण्यासाठी भारतातील अनेक राजकीय नेत्यांकडून Political Leaders धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक खुलासा सीरम इन्स्टिट्यूटचे serum institute सीईओ CEO आदर पूनावाला Adar Poonawalla यांनी ब्रिटनमधील ‘द टाइम्स' वर्तमानपत्रास दिलेल्या मुलाखतीत केला आहे. Threats from political leaders says Adar Poonawalla

देशातील शक्तिशाली नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे उद्योगपती सातत्याने दूरध्वनी करून कोव्हिशिल्ड लशीचा तातडीने पुरवठा करण्यासाठी सांगत आहेत, मला धमकी दिली जात आहे, असे म्हणणे खूपच सौम्य वाक्य होईल. माझ्याकडून असलेल्या अपेक्षा तसेच त्यासाठी त्यांची असलेली आक्रमकता खूप जास्त आहे. आपल्यालाच सर्वप्रथम लस मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते. आपल्याऐवजी दुसऱ्याला का मिळाली हा त्यांचा प्रश्न असतो, असे पूनावाला यांनी या वेळी म्हटले.

पूनावाला पुढे म्हणतात, तुम्ही आम्हाला लस दिली नाहीत, तर ते चांगले होणार नाही. या वाक्यात काही आक्षेपार्ह नाही, पण ते ज्याप्रकारे सांगितले जाते, त्यातून मी त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर आपण काय करू शकतो, हेच सूचित केले जात आहे. त्यांची मागणी पूर्ण न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असे ते सांगतात. Threats from political leaders says Adar Poonawalla

सद्यपरिस्थिती पाहता मी लंडनला आलो असून मी येथील मुक्काम वाढवला आहे. लसीकरणाची सर्व जबाबदारी मी एकटा पेलू शकत नाही. त्यांच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल, याचा विचार करणेही अशक्य आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live