मास्क कारवाई साठी गेलेल्या पोलिसांवर तीन परप्रांतीयांनी सोडला कुत्रा

प्रदीप भणगे
बुधवार, 28 एप्रिल 2021

विना मास्क कारवाई दरम्यान तीन जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याची घटना डोंबिवलीत  घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी तीन परप्रांतीयांवर गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली आहे

डोंबिवली : विना मास्क No Mask कारवाई दरम्यान तीन जणांनी पोलिसांशी Police हुज्जत घालत पोलिसांच्या अंगावर कुत्रे Dog सोडल्याची घटना डोंबिवलीत Dombivali घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी तीन परप्रांतीयांवर गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली आहे. Three arrested in Dombivali Police for Violating Mask Rules

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक आजही विना मास्क फिरताना आढळून येत आहेत.अशा बेजबाबदार नागरिकाविरोधात महापालिका Municipal Corporation व पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.मात्र बेजबाबदार नागरिक अनेकदा कारवाई दरम्यान पोलीस आणि पालिकेच्या पथकाशी हुज्जत घालत दिसत असतात.डोंबिवली मध्ये काल एक असाच विचित्र प्रकार घडला.

डोंबिवली Dombivali खंबाळपाडा रोडवर महापालिका व पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. याच दरम्यान एका गॅरेजच्या बाहेर तिघे विना मास्क आढळले या तिघांवर कारवाई करताना तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. इतकेच नव्हे तर पाळलेला कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी तायडे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी डोंबिबली पोलीस ठाण्यात आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता,आदित्य गुप्ता या तीन परप्रांतीय विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live