तीन मुलांचे अपहरण करुन गुप्तांगाला बाम लावला; पिंपरीतला विकृत प्रकार

गोपाळ मोटघरे
रविवार, 9 मे 2021

पिंपरी - चिंचवड शहरातील रिव्हर रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. लैगिंक शोषण करणाऱ्या आरोपींनी अगोदर पीडित अल्पवयीन मुलांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांना लाथा - बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

पिंपरी : विकृतीचा कळस गाठणारी एक अत्यंत धक्कादायक घटना पिंपरी - चिंचवड Pimpri Chinchwad शहरा मध्ये घडली आहे. चोरी केल्याच्या संशयावरुन तीन अल्पवयीन मुलाचं अपहरण Kidnapping करून, त्यांच्या गुप्तांगाला बाम लावून मुलांचं लैगिंक अत्याचार Sexual Abuse करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. Three Children Sexually abused in Pimpri Chinchwad 

पिंपरी - चिंचवड शहरातील रिव्हर रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. लैगिंक शोषण करणाऱ्या आरोपींनी अगोदर पीडित अल्पवयीन मुलांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांना लाथा - बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच पीडित मुलांच्या गुप्तांगांना आणि गुद्द द्वारावर बाम लावला. बाम लावल्यानंतर आरोपींनी पीडित मुलांच्या अंगावर चावा घेण्यासाठी आरोपींना कुत्रे सोडले. अरुण टाक असे यातील एका संशयिताचे नाव आहे

हे देखिल पहा - 

या सर्व प्रकाराचे आरोपींनी आपल्या मोबाईल मध्ये व्हीडीओ चित्रीकरण केलं आहे, असे या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे. तुम्ही आमच्या बाजारातील दुकानात वारंवार चोरी करता या संशयावरून आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलां सोबत अशा प्रकारे अत्यंत विकृत वर्तन केलं. Three Children Sexually abused in Pimpri Chinchwad 

परभणी पोलिस दलातसे संजय राऊत करताहे सहकाऱ्यांचे मनोरंजन

याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये १९ संशयिक आरोपीं विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. लैगिंक अत्याचार करणाऱ्या  आरोपीं विरोधात पिंपरी पोलिसांनी बाल लैगिंक अत्याचार कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा करणारे १९ ही आरोपी अजून फरार आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live