क्रिकेट बूकी सोनू जालानचा परमबीरसिग यांच्या विरोधात वसुलीचा आरोप

सूरज सावंत
सोमवार, 3 मे 2021

कुप्रसिद्ध क्रिकेट बूकी सोनू जालान याने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे. सोनू जालानने परमबीरसिंग यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी अर्ज दिला आहे

मुंबई : कुप्रसिद्ध क्रिकेट बूकी सोनू जालान याने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे. सोनू जालानने परमबीरसिंग यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray , गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे Sanjay Pande, यांच्याकडे लेखी अर्ज दिला आहे. Three Cricket Bookies extrotion complaint Against Parambir Singh  

२०१८ साली परमबीरसिंग Parambir Singh यांनी मकोका लावून ३ कोटी ४५ लाख वसूल केल्याचा सोनू जालान Sonu Jalan याचा आरोप आहे. या पञात निवृत्त पोलिस निरिक्षक प्रदिप शर्मा Pradeep Sharma आणि राजकुमार कोथमिरे, के. टी. कदम यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण पोलिस महासंचालक DGP कार्यालयाकडून स्टेट सीआयडीला CID वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आणखी एक बूकी केतन तन्ना उर्फ राजा यानेही परमबीरसिंग यांच्यावर पैसे वसुलीचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्याकडून ...  १ कोटी २५ लाख वसूल केल्याचा तन्नाचा दावा आहे. परमबीर यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांची चौकशी करा, आम्ही दोषी असू तर आमच्यावर कारवाई करा, पण न्याय द्या अशी मागणी या दोघांनी केली आहे. या व्यतिरिक्त मुनीर अहमद मोहमद शिरीन पठाण (मुनीर खान) या बुकीनेही परमबीरसिंग यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तिन्ही तक्रारींमधला तपशील जवळपास सारखा आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live