महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच थ्रीडी प्रदर्शन

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच थ्रीडी प्रदर्शन

कोल्हापूर : वैद्यकीय व्यवसाय सांभाळत इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील डॉ. ज्योती दशावतर बडे यांनी कोलाज मधून थ्रीडी शिवचरित्र साकारले आहे. तब्बल 12 थ्रीडी कोलाजमधून साकारलेल्या या चित्रात शिवाजी महाराजांचा जन्मकाळ ते मृत्यूपर्यंतचा सर्व प्रवास समावेश करण्यात आला आहे.

डॉ. ज्योती बडे यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी हे होय. गावामध्ये असतानाच लहानपणी ते दिवाळीच्या काळामध्ये किल्ले करत असत. त्यावेळी त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राबद्दल मोठे आकर्षण होते. खरेतर त्यांना कला अथवा अन्य क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र घरच्या आग्रहास्तव त्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतला.

वैद्यकीय क्षेत्र सांभाळत असताना त्यांच्यातील सुप्त कलागुणांची संधी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कोलाजमध्ये त्यांनी सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक प्रसंगाचे चित्र तयार केले. त्यामध्ये अनेक रंगसंगतीचा वापर करीत मावळ्यांसह शिवाजी महाराजांचा दरबार साकारले आहे. रंगीबेरंगी कपडे व अनेक साहित्य मूळ स्वरूपात वापरल्यामुळे हे चित्र खूपच आकर्षक ठरले. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म ते बालपण, प्रशिक्षण, आग्र्याहून सुटका अशा विविध विषयासह चित्रे साकारण्याचा निर्णय घेतला.

तब्बल पाच ते सहा वर्षे प्रचंड परिश्रम घेत साकारलेले हे भव्य कोलाज आता आकर्षक बनले आहे. अनेक ठिकाणी या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. डॉक्टर बडे यांना त्यांचे पती डॉ. दशावतार बडे यांचे महत्त्वपूर्ण सहयोग लाभले. त्यांच्या या कलेसाठी त्यांनी दवाखान्यातच एक स्वतंत्र दालनं तयार करून दिले आहे. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत अत्यंत उत्कृष्ट कला जपलेल्या डॉक्टर बडे यांचे हे परिश्रम नक्कीच कौतुकास्पद ठरताहेत.


Web Title: three d photo collection of Shivaji Maharaj by Dr Bade
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com