मुंबई: वरळीत भीषण कार अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबईतील वरळीत भरधाव बीएमडब्ल्यू कार डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वृद्ध महिला व सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

मुंबई:  भरधाव कारवरील ताबा सुटल्याने वरळीत भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कार चालवणारी महिला बचावली असली तरी तिला सहा वर्षांच्या मुलीसह आईलाही गमवावं लागलं आहे. अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 जखमी महिलेचे नाव नमिता चंद असे असून त्यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नमिता या अंधेरीतील राहणाऱ्या आहेत, असे सांगण्यात आले. या अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला त्यात नमिता यांची सहा महिन्यांची मुलगी, ७० वर्षीय आई व ६२ वर्षीय नातेवाईक यांचा समावेश आहे.
नमिता चंद  ही कार भरधाव चालली होती. कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालवत असलेली महिला गंभीररित्या जखमी झाली.

कार भरधाव वेगाने चालवत असताना अचानक कार स्पीड ब्रेकरवर चढली आणि कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिव्हायडरला वेगाने आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. वरळीतील मेला रेस्टॉरंट जंक्शनवर हा अपघात झाला. 

 

WebTittle ::  Three killed in car accident in Worli


संबंधित बातम्या

Saam TV Live