पुण्याच्या ग्रामीण भागात ऑक्सिजन अभावी तिघांचा बळी..

रोहिदास गाडगे
बुधवार, 21 एप्रिल 2021

कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्था तोकडा पडताना दिसत आहे

पुणे : मुंबई Mumbai पाठोपाठ राज्यातील कोरोनाचा Corona मुख्य हॉटस्पॉट Hotspot असलेल्या पुण्यात Pune मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्था तोकडा पडताना दिसत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुण्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता  नाकारता येत नाही . Three killed due to lack of oxygen in rural Pune

आता कोरोनाबाधित रुगांसाठी ऑक्सिजन Oxygen पुरवठा थांबल्याने चाकण Chakan मधील क्रिटीकेअर हॉस्पिटलमधून मध्यरात्री १४ रुग्णांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. यातीलच ३ जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले आहे. त्यामुळे आता कोरोना महामारीच संकट अधिकच तीव्र होऊ लागले आहे. प्रशासनाचे Administration ढिसाळ नियोजन यामधून दिसून येत आहे. दरम्यान आतापर्यंत चाकण मधील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाले नसल्याचे वास्तव या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. यामुळे ऑक्सिजन अभावी  रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू कसा रोखणार हा गंभीर प्रश्न आहे.

Edited By- Digambar Jadhav

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live