धक्कादायक - जंगलातील आग विझवताना गोंदियामध्ये तीन मजुरांचा मृत्यू..

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

नागझिरा व पितेझरी या वनक्षेत्रात अज्ञात इसमांनी आग लावली असून, या आगीचे उग्र रूप धारण झाल्याने ही आग विझवताना तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे

गोंदिया : नागझिरा व पितेझरी या वनक्षेत्रात (Forest area) अज्ञात इसमांनी आग लावली असून, या आगीचे उग्र रूप धारण झाल्याने ही आग विझवताना तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी असल्याचे उघडकीस आले आहे. Three laborers died while extinguishing a forest fire

गंभीर जखमी असलेल्या मजुरांना नागपूर (Nagpur) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागझिरा व पितेझरी या वनक्षेत्रा मध्ये काल सकाळी ११.३० च्या दरम्यान आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी  ५०-६० वन कर्मचारी, अधिकारी व हंगामी मजूर करत होते. मात्र त्या वेळेस वारा खूप असल्याने आग मोठ्या प्रमाणात पेटत गेली.

आग (Fire) विझवत असताना मजुरांच्या चारही बाजूने पेटल्याने मध्यभागी असलेल्या मजुरांना कोणतेही हालचाल करता आली नाही. त्यामुळे मध्यभागी ५ ते ६ मजूर अडकले. त्या ठिकाणी ३ मजुरांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे, तर २ गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे सर्व मजुरांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राकेश युवराज मडावी वय 40 वर्ष राहणार थाडेझरी, रेखचद गोपीचंद राणे वय 45 राहणार धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे वय 27 राहणार कोसमतोंडी हे या आगीत मरण पावले. विजय तीजाब मरस्‍कोले वय 40 वर्ष राहणार थाडेझरी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया व  राजू शामराव सयाम वय 30 वर्ष राहणार बोरुंदा जिल्हा गोंदिया, या  जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवलेले आहे,त्यांच्यावर उपचार चालू आहे.Three laborers die while extinguishing a forest fire

Edited By - Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live