अंगावर भिंत पडून तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू !

संजय जाधव
गुरुवार, 10 जून 2021

मेहेकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे रात्री भयंकर पाऊस झाला या पावसामुळे एका घराची भिंत पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे

बुलढाणा : Buldhana मेहेकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे रात्री भयंकर पाऊस झाला या पावसामुळे एका घराची भिंत Wall पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू Death झाला आहे. तर याच कुटुंबातील 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Three year old girl dies unfortunately after falling wall

यवतमाळमध्ये 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू

अंजनी बुद्रुक येथे रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे Rain मनवर मस्तान खान पठाण यांच्या घराची भिंत पडली. ही भिंत अकबर पठाण यांची 3 वर्षाची मुलगी आशिया हिच्या अंगावर पडली त्यात ती गंभीर जखमी झाली होती.

आशिया हिला औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना बीबी गावाजवळच या चिमुकलीची प्राणज्योत मालवली तर याच कुटुंबातील हसीना मनवर पठाण, मनवर मस्तान पठाण, इम्रान मनवर पठाण हे तिघे जण जखमी झाले आहेत.

हे देखील पहा -

त्यांच्यावर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भिंत पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भिंत पडल्यामुळे घरातील जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live