जुन्नरमध्ये कोरोनाकाळात सेवेसाठी देवदूताप्रमाणे धावून आलेत तीन तरुण...

रोहिदास गाडगे
गुरुवार, 22 एप्रिल 2021

जुन्नर तालुक्यातील तीन युवकांनी एकत्र येऊन खाजगी कारमधुन मोफत सेवा सुरु केली आहे. यामार्फत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना तात्काळ आवश्यकतेप्रमाणे रुग्णालयात मोफत नेण्याचे काम हे तिघे करतात. हि रुग्ण वाहतुक सेवा ग्रामीण आणि डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एखाद्या देवदुत प्रमाणे ठरत आहे

जुन्नर: कोरोना Corona महामारी संकट काळात जगण्या-मरण्याची एक वेगळी लढाई सुरु आहे.  त्यातच अँब्युलन्स Ambulance रुग्णांच्या सेवांसाठी देवदुत ठरत असताना जुन्नर तालुक्यातील तीन युवकांनी एकत्र येऊन खाजगी कारमधुन Private car मोफत सेवा सुरु केली आहे. यामार्फत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना तात्काळ आवश्यकतेप्रमाणे रुग्णालयात मोफत नेण्याचे काम हे तिघे करतात. ही रुग्ण वाहतुक सेवा ग्रामीण आणि डोंगराळ भागातील Rural and hilly areas नागरिकांसाठी एखाद्या देवदुत प्रमाणे ठरत आहे. Three youths from Junnar are helping Corona patients by their private vehicle

पुणे Pune जिल्ह्यातल्या जुन्नर Junnar तालुक्यातील या तीन युवकांनी कोरोना रुग्णांसाठी देवदुत बनत कोरोना काळात एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागातील नागरिकांना अगदी सहज आणि वेळेवर योग्य उपचार मिळवू शकत आहेत. 

जुन्नर तालुक्यातील निलेश चव्हाण, श्रीकांत जाधव, कमलेश वंडेकर या तीन तरुणांनी त्यांच्या कल्पनेतून 'राज फाऊंडेशनची' Raj Foundation स्थापना केली. यातुन कोरोना काळात डोंगराळ आदिवासी भागातील नागरिकांना रुग्ण वाहतुक सेवा मिळवुन देण्याची संकल्पना मांडली गेली. आणि सामाजिक बांधिलकीतुन एक पाऊल पुढे टाकत जुन्नरमधुन ही मोफत सेवा सुरु केली गेली. आतापर्यंत या तिघांच्या माध्यमातून मागील 15 दिवसांत 75 पेक्षा जास्त कुटुंबातील लोक ज्यांना कोरोना सदृष्य लक्षणे आहेत त्यांची सेवा करण्यात आली आहे. तसेच कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना, कुटुंबियांच्या इच्छेनुसार शासकीय तसेच खाजगी  रुग्णालयात वाहनांतून अत्यंत कठीण प्रसंगात ने-आण करणे अशी कामे ही सगळी मंडळी करत आहेत. आणि जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत हि सेवा ते तिघे कायम सुरु ठेवणार आहेत. Three youths from Junnar are helping Corona patients by their private vehicle

ऐन कोरोना संसर्गाच्या वाढीच्या स्थितीत एकीकडे कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असताना अशा प्रकारे या बाधित रुग्णांना रुग्णालयात तात्काळ पोहचविणे, आपल्या जीवाची पर्वा ना करता रुग्णांसाठी काम करणे, त्यांना ऑक्सीजनची सुविधा असलेल्या रुग्णालयांपर्यंत पोहचवणे तसेच अन्य कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे शिवधनुष्य या तिघांनी पेलले आहे. 

या सामाजिक उपक्रमाबद्दल Social activities या युवकांचे जुन्नर तालुक्यातील पंचकृषीत कौतुक होत आहे. यासोबतच रुग्णांच्या कुटुंबियांकडूनही कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live