दुर्दैवी : बारामतीत कोरोनाने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

मंगेश कचरे
रविवार, 9 मे 2021

बारामतीत कोरोनाने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बारामतीत गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराने हाहाःकार माजवला आहे

बारामती : बारामतीत Baramti कोरोनाने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बारामतीत गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराने हाहाःकार माजवला आहे. कोरोना Corona बाधित रुग्णांची संख्याही वीस हजाराच्या वर गेली आहे.  Threee Brothers in Baramati died due to corona

अशातच बारामतीत सख्ख्या तीन भावांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. बाळासाहेब गेनबा गायकवाड , प्रल्हाद गेनबा गायकवाड आणि शरद गेनबा गायकवाड, अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान, बारामतीत काल १९० नवीन  पॉझिटीव्ह सापडले आहेत . बारामतीतील रुग्ंणाच्या संख्येत मात्र थोडी घट झाली आहे. आतापर्यंत बारामतीत २०४३१ रुग्ण आढले आहेत. यापैकी १९०१ रुग्ण बरे झाले आहेत तर  आतापर्यंत ४६१ मृत्यू झाले आहेत.

राज्याची रुग्णसंख्या स्थिरावली

बारामती शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसाने दिवसापासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र लसीचा तुटवडा होत असल्याने लसीकरणाला वेग मंदावला होता. मात्र आज बारामती शहर आणि तालुक्यातील लस संपल्यामुळे ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण  बंद असल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली. Threee Brothers in Baramati died due to corona

आतापर्यंत तालुक्यामध्ये ९७ हजार २३७  नागरिकांचे लसीकरण झाले आहे काल आणि आजही लसीकरण बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live