दिवाळीसाठी आतापासूनच गाड्या फुल्ल 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

पुणे मार्गावरील काही गाड्यांमध्ये दिवाळीनंतरच्या लगेचच्या तारखांची तिकीट विक्री बंद झाली आहे. दरम्यान, दिवाळीची गर्दी लक्षात घेता हवाई वाहतुकीसह खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर गगनाला भिडले आहेत.दिवाळीला अजून सव्वा महिना असला तरी नागपुरातून जाणाऱ्या सर्वच मार्गांवर प्रवाशांनी आधीच रेल्वेची तिकिटे काढून ठेवली आहेत. 

पुणे मार्गावरील काही गाड्यांमध्ये दिवाळीनंतरच्या लगेचच्या तारखांची तिकीट विक्री बंद झाली आहे. दरम्यान, दिवाळीची गर्दी लक्षात घेता हवाई वाहतुकीसह खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर गगनाला भिडले आहेत.दिवाळीला अजून सव्वा महिना असला तरी नागपुरातून जाणाऱ्या सर्वच मार्गांवर प्रवाशांनी आधीच रेल्वेची तिकिटे काढून ठेवली आहेत. 

दिल्ली, हावडा, मुंबई, पुणे, चेन्नई, अशा सर्वच मार्गांवर 'भरती' आहे. दरवर्षीच दिवाळी व उन्हाळ्यात रेल्वे गाड्या आधीच फुल्ल होतात. यंदाही तशीच स्थिती आहे. यावर्षी २७ ते २९ ऑक्टोबर अशी दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी नागपुरातून जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी आहे पण तिकीट विक्री बंद झालेली नाही. मात्र दिवाळी संपल्याबरोबरच्या लगचेच्या दोन दिवसांत आतापासूनच गाड्या फुल्ल झाल्या आहेत. 

 १२१३६ नागपूर- पुणे एक्सप्रेस या गाडीत ३० ऑक्टोबर रोजी सेकंड एसीमध्ये ७२, थर्ड एसी २५२ व स्लिपरमध्ये ३०७ अशी प्रतीक्षा यादी आहे. त्याचप्रमाणे २ नोव्हेंबर रोजी या गाडीत सेंकड व थर्ड एसी, स्लिपर तिकीट विक्री बंद झाली आहे. मुंबई मार्गावरही हीच स्थिती आहे. १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये ३० ऑक्टोबर रोजी एसी फर्स्ट ८, सेंकड ३०, थर्ड ५८ व स्लिपर १४५ अशी प्रतीक्षा यादी आहे. १२१४० सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये ३० ऑक्टोबर रोजी सेंकड एसी ९, थर्ड एसी ३६, स्लिपर ६३ अशा प्रतीक्षा यादी आहेत.भाऊबिजेच्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी १२११४ नागपूर- पुणे गरीब रथ या गाडीची (एसी थ्री) तिकीट विक्री बंद झाली आहे. ४०१वर या गाडीची प्रतीक्षा यादी बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे ३ नोव्हेंबर रोजीही पुन्हा या गाडीची तिकीट विक्री बंद आहे.

१२७२३ तेलंगण एक्स्प्रेसमध्ये २९ रोजी सेंकड व थर्ड एसीची तिकीट विक्री बंद झाली आहे. १२८०९ हावडा मेलचा विचार केल्यास २९ तारखेला फर्स्ट एसी १, सेकंड ९, थर्ड १० स्लिपर ७३ अशी प्रतीक्षा यादी आहे. १२१२९ आझाद हिंद एक्स्प्रेस, १२८५९ गीतांजली एक्स्प्रेस या गाड्यांची प्रतीक्षा यादीही वाढली आहे. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर १२२९० नागपूर- मुंबई दुरंतो एक्स्प्रेस ३० ऑक्टोबरला एसी फर्स्ट ७, सेंकड २५, थर्ड ८४ व स्लिपर १८४ अशी वेटिंगची स्थिती आहे. दिल्ली मार्गावर १२६२१ तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ३० ऑक्टोबरला एसी फर्स्ट २, सेंकड ९, थर्ड १० व स्लिपर २२ अशी प्रतीक्षा यादी आहे. 

दिवाळी संपल्याबरोबर ३० ऑक्टोबर रोजी नागपूर- मुंबई विमानाचे दर ७ हजार ते १२ हजार रुपये झाले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी हेच दर ५४७३ ते ९९३६ रुपये असे आहेत. ३० ऑक्टोबर रोजी नागपूर- पुणे साधारण ८००० रुपये व ३१ तारखेला ६००० ते ८००० रुपये असे एका व्यक्तीच्या प्रवासाचे दर आहेत..  दिवाळीपूर्वी २६ ऑक्टोबर रोजी मुंबई- नागपूर विमानाचे दर ९६७८ ते १५ हजार रुपये असे आहेत. याच तारखेला पुणे-नागपूर विमान प्रवासाचे दर १०,००० ते १३,००० रुपये आहेत. एरव्ही हेच दर २५०० ते ३३०० रुपये असतात. मात्र दिवाळीमुळे विमान कंपन्यांनी दुपटीपेक्षा जास्त दर केले आहेत. 
ट्रॅव्हल्सचे दर वाढले

 दिवाळीच्या काळात दर वाढतात हे खरे आहे पण हा वाढीव दर आम्हाला जाताना किंवा येताना असा एकदाच मिळतो. म्हणजे दिवाळीपूर्वी नागपूर-पुणे फेरीला फार प्रवाशी नसतात. त्यामुळे अनेकदा तर मोजक्या प्रवाशांसह गाडी न्यावी लागते. मग ही तूट तिकडून येताना वाढलेल्या दरामुळे भरून निघते. त्यामुळे दुप्पट दराने ट्रॅव्हल्सवाले खूप कमाई करतात, हा समज चुकीचा असल्याचे ट्रॅव्हल्स असोसिएशनचे बाबा डवरे यांनी सांगितले. ट्रॅव्हल्स कंपन्यांचे दिवाळीचे बुकिंग सुरू झाले आहे. एरव्ही नपूर-पुणे-नागपूर १२०० ते १५०० रुपये प्रती व्यक्ती तिकीट दर असतात. सध्या दिवाळपूर्वी नागपूरवरून पुण्याला जाण्याच्या दरात वाढ नाही मात्र पुण्यावरून-नागपूरला यायला ३००० ते ३५०० रुपये द्यावे लागत आहेत. नागपुरातून पुण्यासाठी रोज जवळपास ८० खासगी बसेस धावतात.

Web Title ticket booking full before diwali
 


संबंधित बातम्या

Saam TV Live