गोंदियात धावत्या दुचाकीवर वाघाने घातली झडप... 

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 4 मे 2021

कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात काल रात्री दुचाकीने प्रवास करीत असलेल्या दोघांवर वाघाने झडप घातल्याची चित्तथरारक घटना घडली आहे. अचानक झालेल्या वाघाच्या या हल्ल्यामुळे दुचाकीस्वार खाली पडले. तर दुसरीकडे वाहनाच्या प्रकाशामुळे वाघाने रस्त्याकडेला उडी मारली.

गोंदिया - कोहमारा Kohmara मार्गावरील मुरदोली जंगल Murdoli Forest शिवारात काल रात्री दुचाकीने प्रवास करीत असलेल्या दोघांवर वाघाने Tiger झडप घातल्याची चित्तथरारक घटना घडली आहे. अचानक झालेल्या वाघाच्या या हल्ल्यामुळे दुचाकीस्वार खाली पडले. तर दुसरीकडे वाहनाच्या प्रकाशामुळे वाघाने रस्त्याकडेला उडी मारली. Tiger Attacked running bike in Gondia

हा थरार त्या मार्गाने जात असलेल्या चारचाकी वाहनचालकांनी प्रत्यक्ष अनुभवला. या दरम्यान मदतीसाठी एका वाहनचालकाने आपले वाहन थांबवले. वाहन थांबवून दुचाकीस्वारांना मदत  दिल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. यात दुचाकीस्वार वाघाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. 

हे देखिल पहा - 

साताऱ्यात आजपासून सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन

रंजित परशुरामकर (वय ३५), दानेश गहाने (वय ४०) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे दुचाकीने गोरेगाव डव्वा च्या दिशेने जात होते. हा प्रकार त्यांच्च्या मागाहून चार चूकीने जात असलेल्या राजू चांदेवार आणि त्यांच्या चालकाने पहिला. हे पाहताच त्या दोघांनी खाली पडलेल्या दुचाकीस्वारांना वाचवण्याचे ठरवले. Tiger Attacked running bike in Gondia

आपल्या जीवाची कसलीच पर्वा न करता ते गाडीतून बाहेर आले आणि त्यांच्याकडे धाव घेतली. आणि त्यांना उचलले. दरम्यान वाघ रस्त्याच्या कडेलाच आहे असे त्यांना कळले. त्यामुळे त्वरित त्यांनी आपल्या चारचाकीत जखमींना बसवले आणि रवाना झाले. थोडे पुढे  मूरदोली मध्ये गेल्यावर त्यांची विचारपूस केली असता, त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे दिसून आले. दैव बलवत्तर म्हणून या दोघांचेही प्राण वाचले आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live