वाघाचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला

संजय तुमराम
गुरुवार, 3 जून 2021

चंद्रपूरातील Chandrpur  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या Tadoba-Andhari  Tiger Project  पशुवैद्यक अधिकाऱ्यावर वाघाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे  Dr. Ravikant Khobragade जखमी झाले.

वृत्तसंस्था : चंद्रपूरातील Chandrpur  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या Tadoba-Andhari  Tiger Project  पशुवैद्यक अधिकाऱ्यावर वाघाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे  Dr. Ravikant Khobragade जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायाची बोटं गंभीररित्या क्षतीग्रस्त झाली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील डोनी गावालगतच्या जंगलात हा वाघ निपचित अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळाल्यानं  त्याच्यावर गत 2-3 दिवसापासून प्रकल्पाचं पथक पाळत ठेवून होतं. (Tiger attacks veterinary officer) 

रणजित डिसले गुरुजी जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती... (पहा...

आज सकाळी 7.30 वाजता दरम्यान वाघाची प्रत्यक्ष स्थिती बघण्यासाठी सादर पशुवैद्यकीय अधिकारी आणि पथक गेले असता वाघानं अचानक हल्ला चढवला. पळून जाताना खोब्रागडे खाली पडले. तेव्हा वाघानं त्यांचे दोन्ही पाय पकडले. जबड्यात बोटं सापडल्यानं एक बोट तुटलं तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली. सोबतच्या लोकांनी हाकारा केल्यावर वाघ पळाला. दरम्यान, जखमी डॉक्टरला शस्त्रक्रियेसाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले असून, या घटनेनंतर वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे. 

Edited By - Anuradha Dhawade 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live