यवतमाळच्या मांडवी शिवारात वाघाचा पुन्हा थरार  

प्रसाद नायगावकर
मंगळवार, 1 जून 2021

जिल्ह्यातील दुर्गम परिसरातील झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणार्‍या मांडवी बीट येथे पुन्हा एकदा वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला

यवतमाळ  : जिल्ह्यातील Yavatmal दुर्गम परिसरातील झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणार्‍या मांडवी Mandavi बीट येथे पुन्हा एकदा वाघाने Tiger जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून दुसरा थोडक्यात बचावला. Tigers Threat in Yavatmal Mandvi Area Attacked Man

सुधाकर रामभाऊ मेश्राम आणि  रामकृष्ण कानू टेकाम हे दोघे बैलाला पाणी पाजायला जुनोनी शिवारातील चाटवण नाल्यावर गेले होते. यावेळी अचानक दोन्ही बैलांना वाघ दिसताच ते पळू लागले. यावेळी वाघाने अचानक दोघांवर हल्ला चढविला. यामध्ये वाघाने सुधाकर याची मान तोंडाने पकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला.

सुधाकरने कशीबशी स्वतःची सुटका करवून घेतली. या मध्ये तो गंभीर जखमी झाला. रामकृष्ण याने वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. वाघ त्याच्या मागे लागल्याने रामकृष्ण हा झाडावर चढला. मात्र वाघाने रामकृष्णला झाडावर चढू न देता त्याच्या पायाला पकडले व त्याला खाली ओढू लागला. त्यामुळे त्याची पायाची बोटे पूर्णपणे कुरतडले गेले. Tigers Threat in Yavatmal Mandvi Area Attacked Man

महाराष्ट्रातली रुग्णसंख्या घटतेय

या दोघांच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण बैलगाडी घेऊन पाणी पाजणारे सहा ते सात शेतकरी मदतीला धावून आले. त्या दोघांना प्रथम पांढरकवडा आणि नंतर यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे. वाघांच्या सततच्या हल्ल्यांमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live