लोककलावंतांवर उपासमारीची वेळ !

lavani
lavani

शिरूर  : महाराष्ट्राच्या Maharashtra सांस्कृतिक Cultural परंपरेला समृद्ध आणि जिवंत ठेवण्याचं काम पूर्वीपासूनच लोककलेच्या Folk Art माध्यमातून लोककलावंत करत आलेले आहेत. Time of famine on folk artists

मात्र याच लोककलेला आणि लोककलावंतांना कोरोना Corona महामारीने पुरते हैराण करून ठेवले आहे. कोरोना आला आणि लोकसंगीताची आणि लोककलेची धून महाराष्ट्रात मंदावली. 

लॉकडाऊनला  Lockdown शिथिलता मिळाली मात्र महाराष्ट्राची सांस्कृतीक कला मात्र अजुनही लॉकडाऊनच आहे ! शिरुर Shirur तालुक्यातील सणसवाडी येथील आंबिका कला नाट्य केंद्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागील वर्षापासुन बंद असल्याने 100 हुन आधिक सांस्कृतिक नाट्यकला जोपासणाऱ्या  कुटुंबावर आता जीवनाची कला कशी जगायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

लोकमनोरंजनातून आणि नाट्य कलेवर पोटाचं खळगं भरत असताना कोरोना संकटाच्या या कठीण काळात हाताला काम नाही. उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असून शासकीय मदतीची अपेक्षा ठेवून देखील मदत मिळत नसल्याने या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

हे देखील पहा -

सांस्कृतिक कला नाट्य केंद्र बंद झाल्याने नृत्यांगना, तबला, ढोलकी, हलगी वादक, आचारी, अशा अनेकांना कलेपासुन बाहेर पडुन आता हाताला मिळेल ते काम करावं लागत आहे !  Time of famine on folk artists

लॉकडाऊन काळात सांस्कृतीक कला जोपासणाऱ्यांचे हात आता बेरोजगार झालेले आहेत त्यामुळे लोकमदतीची व शासकीय Government मदतीची Help अपेक्षा हे कलावंत व्यक्त करत आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com