कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये आता १२ ते १६ आठवडे अंतर

विहंग ठाकूर
गुरुवार, 13 मे 2021

कोविशील्डच्या  दोन  डोस मधील  अंतर  १२ ते   १६ आठवडे  करण्यात  आले आहे. आधी या  दोन  डोस  मधील अंतर  ६ ते 8  आठवडे  होते

नवी दिल्ली : कोविशील्डच्या  दोन  डोस मधील  अंतर  १२ ते   १६ आठवडे  करण्यात  आले आहे. आधी या  दोन  डोस  मधील अंतर  ६ ते 8  आठवडे  होते. दरम्यान, रशियाची स्पुटनिक व्ही ही लस भारतात आली असून पुढील आठवड्यापासून ती नागरिकांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या जुलैपासून या लसीचे उत्पादन देशात सुरु होणार आहे. Time Gap Between Two Doses of Covishield Incresed

आज दिल्लीत आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. व्हीके पॉल, सदस्य (आरोग्य), निती आयोग यांनी ही माहिती दिली.  कोविड लसीचे सुमारे १८ कोटी डोस भारतात दिले गेले आहेत. अमेरिकेत ही संख्या जवळपास २६ कोटी आहे. तर, भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हे देखिल पहा - 

एफडीए, डब्ल्यूएचओ यांनी मंजूर केलेली कोणतीही लस भारतात येऊ शकते, त्यासाठीचा आयात परवाना केवळ एक दोन  दिवसात मंजूर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. कोणताही आयात परवाना प्रलंबित नाही, असा दावाही त्यांनी केला. Time Gap Between Two Doses of Covishield Incresed

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये आढळले पुरलेले मृतदेह

ब्रिटनकडून आलेल्या अनुभवांच्या आधारे कृती गटाने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले आहे. कोवॅक्सिच्या दोन डोसच्या मधील अंतराबाबत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. 

दरम्यान, कोरोना संसर्ग दरम्यान लसीकरणाबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच लहान मुलांचा  कोरोनापासुन बचाव  करण्यासाठी  त्यांच्यावर कोवॅक्सीन लसीची चाचणी सुरू केली जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संक्रमण होण्याची भिती  वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्व आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने को वॅक्सीन  च्या क्लिनिकल चाचण्यांच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्याला मान्यता दिली आहे. या चाचणीत डीजीसीआयने देशभरात २ ते १८  वर्षांच्या मुलांना लसीकरणासाठी भारत बायोटेकच्या चाचणीस मान्यता दिली आहे.Time Gap Between Two Doses of Covishield Incresed

भारत बायोटेक आता ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेणार आहे. दोन्ही डोस २८ दिवसांच्या आत मुलांना देण्यात येतील.ही चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्समध्ये केली जाईल. त्याशिवाय नागपूरच्या मेडिटरिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे चाचण्या घेण्यात येतील.

Edited By - Amit Golwalkar

 


संबंधित बातम्या

Saam TV Live