आरोग्य यंत्रणेचा बोजवारा - कोरोना रुग्णावर खुर्चीवर बसवून उपचार!

विश्वभूषण लिमये
सोमवार, 12 एप्रिल 2021

रुग्णांना दवाखान्यात मुबलक बेड संख्या नसल्या कारणाने चक्क त्यांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. आज साम टिव्हीवर याबाबतचा सविस्तर वृत्तांत विविध बातमीपत्रांमध्ये दाखवण्यात येणार आहे

उस्मानाबाद : कोरोना Corona रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे. याचा आरोग्य Health यंत्रणेवरील तणावही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी सुविधांची कमतरता जाणवत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्य सुविधांचा अभाव पाहता राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाउनसंबंधी Lockdown काही मोठा निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. Time to give oxygen to corona patient by sitting on a chair due to lack of beds 

याच दरम्यान उस्मानाबादमध्ये Osmanabad अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे उपचारासाठी  बेड Beds उपलब्ध होणं कठीण झालेले आहे. अति प्रमाणात कोरोना संक्रमन झालेल्यांचा आकडा वाढत असल्याने उपचारासाठी गैरसोय होत आहे. अपुरी पडणारी सोयी सुविधा रुग्णांचे हाल करत आहे.

उस्मानाबाद मध्ये सध्या अशीच काहीशी वेळ कोरोना रुग्णांवर आलेली दिसून येत आहे. तेथील रुग्णांना दवाखान्यात मुबलक बेड संख्या नसल्या कारणाने चक्क त्यांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन Oxygen देण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. या वाईट वेळ ओढवलेल्या घटनेचा व्हिडीओ Video सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये Viral Video बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना खूर्चीत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि त्याचे नातेवाईक आणि दवाखान्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसत आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स शक्यती सर्व मदत रुग्णांना करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live