अवकाळीचा बळीराजाला पुन्हा फटका, पाहा काय आहे सध्याची परिस्थिती

साम टीव्ही
सोमवार, 22 मार्च 2021

कोरोनाच्या काळात अवकाळीचा महिना
गारपिटीमुळे पिकं झोपली, शेतकरी कासावीस
अवकाळी पावसाने बळीराजाच्या घामाची माती

 

मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रभर अवकाळी पावसाने थैमान घातलंय अवकाळी पावसासोबतच गारपिटीनेही शेतीचं मोठं नुकसान झालंय. आधी दुष्काळ, मग वादळी पाऊस आणि दुसऱ्यांदा कोसळलेली अवकाळी यामुळे घाम गाळत, पिकवलेली शेती आडवी झालीय.

शेतातील चऱ्यांमध्ये साचलेल्या गारांचा फोटो वापरावा) शेताच्या चऱ्यांमध्ये साचलेल्या गारांनी शेतकऱ्यांच्या स्वप्नांचं राखरांगोळी करून टाकलीय.भर उन्हात घामाचं सिंचन करत वाढवलेली पिकं डोळ्यांदेखत आडवी झालीयत. हे चित्र आहे जालना जिल्ह्यातील.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर आणि जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसलाय. हरबरा, गहू जमिनीवर आडवा होऊन मातीमोल झालाय. मोसंबी आणि आंब्याचा मोहोर गळून पडलाय. अवकाळीच्या या अस्मानीने शेतकरी उध्वस्त झालाय. अवघ्या काही दिवसांत या पिकांची सोंगणी आणि मळणी होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणार होते. धनधान्य घरात येणार होतं. पण गारपिटीमुळे सारं काही उध्वस्त झालंय. 

प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम 

अवकाळीच्या या तडाख्यानं शहरातले रस्ते धो-धो वाहू लागले... अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची त्रेधा-तिरपीट तर उडालीच. पण, शेतकऱ्यांची स्वप्न मातीमोल करून टाकलीयत. बदनापूरच्या काही भागांत जिल्हा प्रशासनाने पाहणीही सुरू केलीय. पण नुसती पाहणी करून, कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरी मदतीचे पैसे तातडीने मिळावेत अशी मागणी शेतकरी करू लागलेयत.

लॉकडाऊनच्या काळात शेतकरी राबत राहिला.बळीराजाने लोकांना अन्नाची कमतरता भासू दिली नाही... आता पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढू लागलेयत. पण आपला शेतकरी मात्र शेतात अविरतपणे न थकता घाम गाळतोय. पण अचान आलेल्या या गारपिटीने शेतीचं निकसान केलंय आणि शेतात वाहणाऱ्या पाटांमधून शेतकऱ्यांची स्वप्न वाहून गेलीयत. त्यामुळे, मायबाप सरकारने आता तातडीने पावलं उचलून शेतकऱ्यांच्या खांद्यावर आधारात हात ठेवावा. त्याचप्रमाणे, पाहणी, पंचनाम्यांच्या लेटलतीफ चपला काढून तत्परतेनं मदतीची पेरणी करावी. अशी आशा शेतकरी व्यक्त करतायत.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live