मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीचा दणका

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 2 मार्च 2020

पुणे : हवामानात होत असलेल्या वेगवान बदलांमुळे शनिवारी (ता. २९) रात्री व रविवारी (ता.१) पहाटे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह आलेल्या वादळी पावसाने दणका दिला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात गारांसह वादळी पाऊस पडला. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाने हजरी लावली. साताऱ्यात रविवारी दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस झाला. 

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात शनिवार (ता. २९) सायंकाळी वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील डॉक्टरवाडी, बाभूळवाडी, जळगाव खुर्द, जळगाव बुद्रुक, पिंपरखेड, परधाडी, चांदोरे, कासारी, नस्तनपूर आसपासच्या गावांमध्ये शिवारात वादळी वाऱ्यासह गारांसह पावसाने हजेरी लावली.

एक तासभर पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतात पाणी साचले सोलापूर सोलापूर जिल्ह्यात रविवारी (ता.१) पहाटे साडेबारा ते एकच्या सुमारास उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ आणि माढा भागात गारांसह अवकाळी पावसाने अचानकपणे लावलेल्या हजेरी लावली. प्रामुख्याने उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा भागात पावसाने हजेरी लावली.

मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव, नरखेड, मसलेचौधरी, बार्शीतील वैराग, पानगाव, मळेगाव, पिंपरी, उत्तर सोलापुरातील नान्नज, कारंबा, वडाळा, मार्डी, गुळवंची, माढा तालुक्यातील धानोरे, कापसेवाडी, बुद्रुकवाडी, केवड व वाकाव आदी भागात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील जेहूर, शिऊर, लोहगाव, नागद, चापानेर, गल्लेबोरगाव, मनुर, ढोरकीन, घाटनांद्रा, बनोटी परिसरातील वरठाण, किन्ही, वडगाव, हनुमंतखेडा, पळाशी, मुखेड, वाडी, जायकवाडी, टाकळी राजेराय, गोळेगाव, दावरवाडी, विहामांडवा, नागापूर, रहिमाबाद, निल्लोड, वडोद बाजार व औरंगाबाद शहर परिसरात विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला.  

जालना जिल्ह्यातील अंबड, जाफ्रबाद, भोकरदन तालुक्‍यात ही वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्‍याच्या काही भागात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला.

WEB TITLE- Timely stroke in central Maharashtra, Marathwada

संबंधित बातम्या

Saam TV Live