आज रत्नागिरीत  भाजपची महाजनादेश यात्रा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा निवडणूक, भाजप-शिवसेना युती, कोकण विकास अशा विविध मुद्‌द्‌यांवर ते बोलतील, अशी अपेक्षा सारे बाळगून आहेत. 

उद्या दुपारी कणकवलीत महाजनादेश यात्रेतील सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री राजापूरमार्गे आडिवरे, पावस येथून सायंकाळी रत्नागिरीत पोचतील. जयस्तंभ येथे यात्रेचे जल्लोषी स्वागत केले जाणार असून, ढोल-ताशांच्या गुजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत होईल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सायंकाळी साडेपाच वाजता सभा सुरू होईल. यात्रेमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीष महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आणि सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 

यात्रेची जय्यत तयारी सुरू असून, शहरात विविध ठिकाणी स्वागताचे फलक आणि भाजपचे झेंडे झळकल्याने वातावरण भाजपमय झाले आहे. मंडप उभारणी पूर्ण झाली आहे. मारुती मंदिर येथे शिवाजी स्टेडियमकडे जाणाऱ्या नाक्‍यावरील दुभाजक खुले करण्यात आले. मार्गातील अडथळे, खड्डे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरण व पालिका प्रशासनाने या दौऱ्यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे. 

काय मंत्र देणार? 
गेल्या निवडणुकीत युती तुटल्यामुळे कोकणात भाजपला खाते उघडता आले नाही. या वेळी युती करून भाजपला खाते पुन्हा उघडण्याची संधी आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून सत्ता स्थापनेसाठी भाजपची व्यूहरचना आहे. यासाठी मुख्यमंत्री जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना काय मंत्र देतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.  

Web Title: Today BJP Mahajandhesh Yatra in Ratnagiri

संबंधित बातम्या

Saam TV Live