आज मुंबईत सर्व मार्गांवर मेगाब्लॉक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 सप्टेंबर 2019

मुंबई - उपनगरी रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. 15) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान डागडुजीची कामे करण्यात येतील. 

मध्य रेल्वे 
कुठे : कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान "अप' धीम्या मार्गावर. 
कधी : सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत. 
परिणाम : या स्थानकांदरम्यान "अप' धीम्या लोकल जलद मार्गावर. लोकल, मेल, एक्‍स्प्रेस गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने. 

हार्बर मार्ग 
कुठे : वाशी ते पनवेल आणि माहीम ते गोरेगाव स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' मार्गांवर. 
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. 
परिणाम : सीएसएमटी-बेलापूर/पनवेल मार्गावरील दोन्ही दिशांकडील लोकल बंद. सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे-पनवेल/बेलापूर "अप' व "डाऊन' ट्रान्सहार्बर लोकल बंद. सकाळी 10.45 ते दुपारी 4.01 वाजेपर्यंत सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' लोकल बंद. पनवेल-अंधेरी लोकल सेवाही बंद. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे-नेरूळ/वाशी विशेष लोकल. 

पश्‍चिम रेल्वे 
माहीम ते गोरेगाव स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चर्चगेट ते गोरेगाव स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहील. 

Web Title: today megablock of the railway in Mumbai
 
संबंधित बातम्या

Saam TV Live