आज आहे 'खास' दिवस, गुगलनेदेखील सादर केलं डुडल 

आज आहे 'खास' दिवस, गुगलनेदेखील सादर केलं डुडल 

22 डिसेंबर हा दिवस भौगोलिक कारणांमुळे ओळखला जातो. हा दिवस साजरा करण्याची विशिष्ट पध्दत आहे. हा दिवस गुगलनं देखील डुडल सादर करत साजरा केलाय.. या दिवसानिमित्त गुगलनेही बर्फाळ प्रदेशातल्या आईसबेबीला बनवून हा गुलाबी मोसम आल्याचा आनंद साजरा केला आहे. या डुडलमध्ये पृथ्वीच्या डोक्यावर ही आईस बेबी दिसत आहे.
जगभरात 22 डिसेंबर हा दिवस भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण, या दिवशी वर्षातला सर्वात छोटा दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते. याच दिवसापासून पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील प्रदेशांमध्ये थंडीची सुरुवात होते आणि ती थंडी 20 मार्चपर्यंत असते. आजच्या दिवशी सूर्य पृथ्वीपासून खूप दूर असतो शिवाय चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर फार वेळ असतो. याला इंग्रजीत विंटर सॉल्सटिस असं म्हटलं जातं.

पृथ्वीचा आस 23.5 इतक्या अंशानी कललेला असल्यामुळे पृथ्वीच्या सर्व भागात सूर्याची उष्णता वेगवेगळ्या प्रमाणात पोहोचत असते. याचं स्पष्ट उदाहरण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धात पाहायला मिळतं. विंटर सॉल्सटिसमध्ये सूर्याची किरणं भूमध्य रेषेच्या दक्षिणेला अधिक प्रमाणात पोहोचतात. त्यामुळे उत्तर गोलार्धात थंडीचा मोसम सुरू होतो.

WebTittle:: Today is a 'special' day, Google also presents a doodle


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com