तोत्के चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर जाणवतोय

अनंत पाताडे/अनिल पाटील
शनिवार, 15 मे 2021

रबी समुद्रामध्ये Arabian Sea कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोत्के चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. सिंधुदुर्ग Sindhudurg म्हणजे कोकण Konkan किनारपट्टीला या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे

मुंबई : अरबी समुद्रामध्ये Arabian Sea कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोत्के चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. सिंधुदुर्ग Sindhudurg म्हणजे कोकण Konkan किनारपट्टीला या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे. त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने किनारपट्टीच्या ३८ गावांना सतर्कतेचा Alert इशारा देण्यात आलाय. Totke Cyclone effect on Konkan and Goa Sea Areas

हे देखिल पहा -

दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला असणार आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड आणि घरांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे वातावरण असताना त्याचा फटका कोविड सेंटरला बसू नये म्हणून  जनरेटरची व्यवस्था आरोग्य यंत्रणेने केली आहे.

गोव्यातही परिणाम
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटा जवळील चक्रीवादळ तौतो आज गतिमान होण्याची शक्यता असून पार्श्‍वभूमीवर गोव्यात काल रात्रभर पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडत असल्याने नागरिकांची काहीशी तारांबळ झाली होती. अर्थात कोरोना पार्श्‍वभूमीवर गोव्यात कर्फ्यू असल्याने नागरिकांची ये-जा व वाहनांची वाहतूक मंदावली आहे. Totke Cyclone effect on Konkan and Goa Sea Areas

केजरीवाल बनणार अनाथांचे नाथ

या वादळाची हवामान खात्याने खात्याने आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानुसार विविध ठिकाणी येण्या-जाण्याचा निर्बंध घालण्यात आले असून मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे. तर समुद्रकाठच्या लोकांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे. आज दिवसभरात की सांगे, कानकोन,  केपे, या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live