पुराचं पाणी ओसरल्यावर तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

वैभववाडी : मांडुकली (ता. गगनबावडा) येथे रस्त्यावर आलेले पुराचे पाणी ओसरल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ऱविवारी (ता. ८) सकाळपासून हा मार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्हयात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कोल्हापूरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील मांडुकली काल सकाळी रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे तळेरे-कोल्हापुर मार्गावरील वाहतुक प्रशासनाने बंद केली होती. मांडुकलीत जावून शेकडो वाहनांना माघारी परतावे लागले होते. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली होती.

दरम्यान, साेमवार (ता. ९) पहाटे पाच वाजता मांडुकली येथील रस्त्यावर आलेले पाणी पुर्णपणे. ओसरले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तशा प्रकारचा संदेश गगनबावडा पोलिसांनी वैभववाडी पोलिसांना दिला आहे. 

Web Title: Traffic begins on the Talere-Kolhapur route

संबंधित बातम्या

Saam TV Live