लॉकडाऊनमुळे मॅट्रिमोनी साईट्सवर लग्नाळुंची गर्दी वाढली...

लॉकडाऊनमुळे मॅट्रिमोनी साईट्सवर लग्नाळुंची गर्दी वाढली...

लॉकडाऊनमुळे देशभरातले उद्योग अक्षरशः ठप्प आहेत. मात्र, त्याला अपवाद ठरल्यात मॅट्रिमोनी साईट्स. लग्नाळू लोकांसाठी लॉकडाऊनच्या काळात या मॅट्रिमोनी साईट्स आधार ठरल्यात.

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. सगळे व्यवसाय ठप्प आहेत. मात्र, त्याला लग्न जुळवणाऱ्या मॅट्रिमोनी साईट्स अपवाद ठरल्यात. लॉकडाऊनच्या काळात या मॅट्रिमोनी साईट्सवरचं ट्रॅफिक कमालीचं वाढलंय. लॉकडाऊनमुळे अनेक नोकरदार वर्क फ्रॉम होम करतायत. त्यातल्या अविवाहितांसाठी या मॅट्रिमोनी साईट्स वरदान ठरल्यात. घरात राहून मिळालेल्या मोकळ्या वेळात हे अविवाहित मॅट्रिमोनी साईट्सवर आपल्या भावी जोडीदाराचा शोध घेतायत. 
भारत मॅट्रिमोनी या आघाडीच्या साईटवर दररोज सुमारे १४ हजार ते १५ हजार जण नोंदणी करतात. पण, लॉकडाऊनच्या काळात त्यात ३० टक्क्यांनी वाढ झालीय. तर शादी डॉट कॉम या साईटवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढलीय.

हे लक्षात घेता मॅट्रिमोनी साईट्सनी आता आकर्षक ऑफरही दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात केलेली नोंदणी पूर्णपणे फ्री करण्याचा निर्णय काही साईट्सनी घेतलाय. तर काही साईट्सनी सोशल मीडिया कॅम्पेनही सुरु केलेयत. यात शादी डॉट कॉमनं एक पाऊल पुढे टाकत वेडिंग फ्रॉम होम ही नावीन्यपूर्ण कल्पना समोर आणलीय. यात विवाहेच्छू दाम्पत्याचं लग्न ऑनलाईन पद्धतीनं लावलं जातं. लग्नाचं पौराहित्य करणारे भटजीबुवाही व्हिडिओ कॉलिंग करून लग्नाचे सगळे विधी करतात. या संपूर्ण लग्नसोहळ्याचं लाईव स्ट्रिमिंगही केलं जातं. तसंच, मुलामुलीचे नातेवाईकही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनच नवदाम्पत्याला आशीर्वाद देतात. या पद्धतीने शादी डॉट कॉमनं लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत दोन विवाह लावले आहेत. 
थोडक्यात काय, तर नोकरीच्या व्यापामुळे आतापर्यंत लग्न करू न शकलेल्या लग्नाळूंसाठी यंदाचा लॉकडाऊन हा शुभमुहूर्तच ठरलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Web Title - Traffic of matrimony sites increased by 30% due to lockdown

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com