वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराने नेले फरफटत

गोपाल मोटघरे
शनिवार, 29 मे 2021

लायसन्स आणि कागदपत्रांची विचारपूस करताना झालेल्या वादातून कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसाला दुचाकीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरात घडला आहे.

पिंपरी-चिंचवड : लायसन्स License आणि कागदपत्रांची Document विचारपूस करताना झालेल्या वादातून कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक Traffic पोलिसाला Police दुचाकीने Two Wheeler फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड  Pimpri-Chinchwad परिसरात घडला आहे. Traffic Police Officer Led To Falling Away By A Two-wheeler

सदर घटनेत हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार शंकर इंगळे यांना खरचटल्याने मोठ्या प्रमाणावर दुखापत Injury झाली आहे. या घटनेत दुचाकीने फरफटत नेणाऱ्या संजय शेडगे नामक इसमाला अटक करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी शंकर इंगळे यांना फरफटत नेतानाचे हे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

एक घास मुक्या प्राण्यांसाठी; भिमाशंकर परिसरातील युवकांचा उपक्रम

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नाकाबंदी पॉईंटवर शंकर इंगळे यांनी दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. तेव्हा त्याने हवालदार इंगळे यांच्या सोबत आधी हुज्जत घातली आणि नंतर त्यांना धक्का देऊन गाडी चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. Traffic Police Officer Led To Falling Away By A Two-wheeler

इंगळे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा हात दुचाकीच्या फायबर कॅरियर मध्ये अडकला आणि त्याही परिस्थितीत संजय शेडगे याने गाडी जोरात पळवली तेव्हा इंगळे खाली पडले आणि हा अपघात Accident घडला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live