१ जूनपासून रोज ट्रेन धावणारः रेल्वेमंत्री पियुष गोयल

१ जूनपासून रोज ट्रेन धावणारः रेल्वेमंत्री पियुष गोयल

नवी दिल्लीः पुढच्या दोन दिवसांमध्ये रेल्वेकडून दुप्पट श्रमिक विशेष ट्रेन म्हणजे रोज ४०० ट्रेन चालवल्या जातील. सर्व स्थलांतरीत मजुरांनी आहे त्याच ठिकाणी रहावं. रेल्वेद्वारे १ जूनपासून रोज २०० नॉन एसी ट्रेन चालवल्या जातील. या ट्रेनसाठी फक्त ऑनलाइन बुकींग होईल. लवकर या ट्रेनसाठी बुकींग सुरू होईल. याची माहिती रेल्वेकडून दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी ट्विट करून सांगितलंय. श्रमिक विशेष ट्रेननंतर रेल्वेद्वारे १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी ट्रेन चालवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलीय. या ट्रेनसाठी फक्त ऑनलाइन बुकींग करता येणार आहे, असंही गोयल यांनी स्पष्ट केलंय.
लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरीत मजूर विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. आता रेल्वेने अशा मजुरांना दिलासा दिला आहे.स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी राज्यांनी रेल्वेला सहकार्य करावं. 

सर्व स्थलांतरीत मजुरांनी आहे त्याच ठिकाणी रहावं. त्यांची जवळच्या रेल्वे स्टेशनच्या रजिस्टरमध्ये त्यांचीनोंद करावी. यामुळे मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात सुलभ होईल, असं आवाहन गोयल यांनी केलंय. त्यांना पुढच्या काही दिवसांत सुरक्षितपणे त्यांच्या गावी रेल्वेद्वारे सोडण्यात येईल, असं गोयल म्हणाले.पुढच्या दोन दिवसांमध्ये रेल्वेकडून दुप्पट श्रमिक विशेष ट्रेन म्हणजे रोज ४०० ट्रेन चालवल्या जातील. 

रेल्वेकडून आतापर्यंत १६०० अधिक श्रमिक विशेष ट्रेन चालण्यात आल्या आहेत. याद्वारे १० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात आलं आहे. विविध राज्यांमधून या श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत.

WebTittle :: Trains will run daily from June 1: Railway Minister Piyush Goyal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com