बार्शीत लोकसहभागातून हिंदू, मुस्लिम, लिंगायत स्मशानभूमीचा कायापालट

बार्शी
बार्शी

सोलापूर : जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या Environment रक्षणासाठी शर्तीचे प्रयत्न होत असताना सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शी Barshi देखिल मागे नसल्याचे आजवरच्या सामाजिक संघटनांनी आणि समाजसेवकांनी दाखवून दिले आहे. Transformation of Hindu, Muslim, Lingayat cemetery through public participation in Barshi

पर्यावरणात होणारे दैनंदिन बदल, मानवाच्या जीवनासाठी असलेली निसर्गाच्या संतुलनाची गरज लक्षात घेत अनेक संशोधक, अभ्यासकांनी महत्वाच्या सूचना करुन त्यानुसार अंमलबजावणीचे आवाहन केले आहे. 

यात शुध्द पर्यावरणासाठी वृक्ष लागवड,संगोपन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील विविध घटकांनी मागील काही वर्षांत केलेल्या प्रयत्यातून शहराचे सौंदर्य आणि पर्यावरण अबाधित राखण्याचे काम करत योगदान दिले आहे. 

आज बार्शीतील हिंदू,मुस्लिम,लिंगायत या सर्व स्मशानभूमीचं Cemetary रुपडं बदललं आहे. स्मशानभूमीत हिरवळीतलं आल्हाददायक वातावरण आहे. मयताच्या नातेवाईकांना होणारे दुःख ते या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर काही वेळासाठी का असेना पण विसरुन जावेसे वाटेल अश्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

बार्शीतील सामाजिक संघटनांनी वड,पिंपळ,चिंच,आंबा,औदुंबर अशा झाडांची स्मशानभूमीत लागवड केली आहे. या वृक्षांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करून त्यांची योग्य निगा राखली जात आहे. Transformation of Hindu, Muslim, Lingayat cemetery through public participation in Barshi

हे देखील पहा -

साधारण 2000 सालापासून हे काम अविरतपणे सुरू असल्याचे विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सांगतात.आणि निसर्गसंगोपनाचा हा वसा यापुढेही चालू राहिलं असा विश्वास बार्शीकर व्यक्त करतायत.

स्मशान हे माणसाचं शेवटचं ठिकाण पण मनात आणलं तर त्या स्मशानात ही निसर्गसंपन्न वातावरण निर्माण करून दुःखालाही काही अंशी दूर ठेवता येईल हिरवाई  बार्शीतील सामाजिक संघटनांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवली आहे

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com