सुट्टीच्या दिवशीही गारेगार प्रवास

सुट्टीच्या दिवशीही गारेगार प्रवास

सुट्टीच्या दिवशीही कुटुंबियांसह चर्चगेट ते विरार अशा गारेगार प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. मुंबईकरांची वातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या 'वार'विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शनिवार, १४ सप्टेंबरपासून शनिवार-रविवारी देखील वातानुकूलित लोकल मार्गस्थ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

प्रथम दर्जापेक्षा १.२ पट जास्त भाडे देऊन ही आठवड्यातून केवळ पाच दिवस वातानुकूलित लोकल प्रवास मिळत असल्याने पासधारकांमध्ये प्रचंड नाराजी होती.एसी लोकलमधील तिकीट आणि पासधारकांकडून अनेक महिन्यांपासून शनिवार-रविवार वातानुकूलित लोकल चालवण्याची मागणी होत होती. 

 सध्या चर्चगेट ते विरार मार्गावर वातानुकूलित लोकलच्या १२ फेऱ्या चालवल्या जातात. सध्या या फेऱ्या केवळ सोमवार ते शुक्रवारदरम्यान चालवल्या जात होत्या. तर शनिवार आणि रविवार या लोकलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राखून ठेवण्यात आले होते.मात्र आता अतिरिक्त वातानुकूलित लोकल चाचणी यशस्वी झाल्याने या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.पश्चिम रेल्वेवरील तिसऱ्या वातानुकूलित लोकलची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी देखील ही लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


Web Title::  travel on vacation even on holiday

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com