घरीच उपचार करत या कुटुंबाने कोरोनावर मिळविला विजय

अभिजीत घोरमारे,
सोमवार, 31 मे 2021

हटवार कुटुंबातील  ऐकून सदस्य 13 असून यातील 6 सदस्य कोरोना पोझिटीव्ह Corona Positive निघाले आहे .

भंडारा - देशात कोरोना विषाणूचा  संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" होय हे खर आहे, भंडारा तालुक्यातील  साहुली या गावात ही संपूर्ण घटना घडली आहे . हटवार कुटुंबातील  ऐकून सदस्य 13 असून यातील 6 सदस्य कोरोना पोझिटीव्ह निघाले आहे . त्या कुटुंबातील  80 वर्षीय आई व 3 वर्षीय लहान मुलासह  4 सदस्य कोरोना पोझिटीव्ह निघाले आहे. (Treating at home, the family won over Corona)

भंडार जिल्ह्यामधील हटवार कुटुंबातील सहा ही सदस्याचे HRTC टेस्टच्या स्कोर पांचच्या वरती निघाले आहे . यात 80 वर्षीय मंजुला हटवार यांच्या HRTC टेस्टचा स्कोर 15 निघाला आहे. त्यांचा ऑक्सीजन लेवल ही 84 - 85 वर गेला आहे. परंतु हटवार कुटुंबातील सदस्यांनी कोरोना विषाणूला  न घाबरता, घरीच कोरोना विषाणूवर  उपचार करण्याचे ठरविले होते. 

हे देखील पहा - 

 

त्यांनी भंडारा रुग्णालयातून कोरोना औषध मिळवत उपचार सुरु केला होता. जे कोरोना पोझिटीव्ह निघाले त्यांनी विलगीकरण केरून घेतले होते.  इतर सदस्यांपासुन विशेषता लहान मुलांपासून वेगळे राहु लागले होते. इतर सदस्य त्यांना लागणाऱ्या वस्तु वेळेवर पूरवत गेले होते. सर्व पोझिटीव्ह लोक एका रूममध्ये  राहत होते. 

अवाजवी बिल घेणाऱ्या चाकणमधील रुग्णालयावर गुन्हा दाखल 

एकमेकांची काळजी घेत होते तसेच खास करून आई ची काळजी घेऊ लागले होते असे त्यांच्या मुलाने माहिती दिली आहे.  22 दिवसाच्या घेतलेल्या काळजीमुळे  घरातील सर्व सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ते सर्व आधीसारखे आनंदाने एकत्र राहु लागले आहेत. एकीकड़े जिल्ह्यात कोरोनाने उपचार घेणाऱ्यांच्या मृत्युच्या वार्ताने मन शून्य होऊन जात असतांना साहुली येथील हटवार कुटुंबाच्या एकीमुळे एकमेकांशी काळजी घेत घरीच उपचार करत कोरोनावर मात केली आहे. 

 

Edited By - Puja Bonkile


संबंधित बातम्या

Saam TV Live