प्रौढांमधे मध्यम कोविड संसर्गाच्या उपचारासाठी झायडस कॅडिलाच्या विराफिनला डीजीसीआयची मंजूरी

zydus cadila
zydus cadila

नवी दिल्ली : विराफिन Virafin या अँटीवायरल औषधाच्या वापरासाठी सरकारची मान्यता अश्या वेळी मिळाली जेव्हा भारताची दररोज कोविड संख्या तीन लाखांचा टप्पा ओलांडत आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय)  झायडस कॅडिलाच्या Zydus Cadilas पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा -2 बी,(PegIFN) प्रौढांमधील मध्यम कोविड १९ संसर्गाच्या उपचारांसाठी 'विराफिन'च्या  वापरास मान्यता दिली आहे.For Treating Moderate Covid Case Zydus Cadilas Virafin has been Approved

अँटीवायरल व्हिराफिनची एक डोस दिल्यास रूग्णांसाठी उपचार अधिक सोयीस्कर होते. तसेच कोविड १९ च्या काळात जर या औषधाला लवकरात लवकर परवानगी देण्यात आली तर, विराफिन रूग्णांना लवकर बरे होण्यास मदत करेल आणि शरीरातील त्रुटी सुद्धा दूर करेल असे कंपनीने म्हटले आहे.

एका प्रकाशनात, कॅडिला हेल्थने नमूद केले आहे कि, "इतर विषाणूजन्य संक्रमणाविरूद्ध देखील हे औषध कार्यक्षमता दर्शवित आहे." या तंत्रज्ञानाविषयी बोलताना कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले कि, “लवकर उपचार दिल्यास विषाणूचा शरीरावरचा भार कमी होण्यास मदत होते. याची आम्ही एक थेरपी देऊ करत आहोत. यामुळे आजार बरे होण्यास मदत होते.

त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांमध्ये, या उपचार पद्धतीने कोविड १९ च्या कोरोना पीडित रूग्णांमध्ये चांगली सुधारणा दर्शविली आहे. चाचण्या दरम्यान, पेगिफन आर्मद्वारे जास्त प्रमाण दिल्यास सात दिवसांमध्ये त्यांचा कोरोना आरटी-पीसीआर अहवाल नेगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक दिसून येतो. हे औषध व्हायरल इन्फेकशन लवकर दूर करते. तसेच इतर आँटी-व्हायरल एजंट्सच्या तुलनेत त्याचे अनेक फायदे आहेत अशी हमी देखील दिलेली आहे. 

केंद्र सरकारने आपल्या एका प्रमुख घोषणेत अठरा वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना कोविड लस देण्याचे ठरविले आहे.

गेल्या २४ तासांत भारतात 3,32,730 नवीन कोविड प्रकरणे नोंदली गेली. सलग दोन दिवसांपासून भारताने 3 लाख कोविड केसेसचा आकडा ओलांडला आहे. यामुळे देशातील कोविड संक्रमणा एकूण संख्या 1,62,63,695 एवढी झाली आहे.कोविड  मध्ये गेल्या दोन तासांत देशात 2,263 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे.  देशात सध्या सक्रिय 24,28,616 प्रकरणे आहेत.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com