नंदुरबार, रेल्वे स्थानकात कोविड कोच सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु

दिनू गावित
मंगळवार, 20 एप्रिल 2021

नंदुरबार रेल्वे स्थानकात दाखल झालेल्या रेल्वे कोविड कोच सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचाराला सुरुवात  करण्यात आली आहे. नेहमी प्रवासासाठी वापरली जाणारी रेल्वे आता कोरोनाबधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरली जात आहे. 

 

नंदुरबार Nandurbar रेल्वे स्थानकात Railway station दाखल झालेल्या रेल्वे कोविड Covid कोच सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचाराला सुरुवात  करण्यात आली आहे. नेहमी प्रवासासाठी वापरली जाणारी रेल्वे आता कोरोनाबधित corona रुग्णांच्या उपचारासाठी वापरली जात आहे. Treatment of corona patients started at nandurbar railway station

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत परिस्थिती नियंत्रणात होती परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात परिस्थिती गंभीर झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील खाजगी व शासकीय रुग्णालय फूल झाले असून रुग्णांना वेळेवर उपचार मिळणं कठीण झाले आहे.

जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड rajendra bharud यांनी महाराष्ट्र शासनाकडे रेल्वे कोवीड कोचची मागणी केल्यानंतर केंद्रीय रेल्वे विभागाद्वारे आयसोलेशन वार्ड isolation ward तयार केलेली ३१ डब्यांची रेल्वे दाखल झाली असून प्लॅटफॉर्म platform क्रमांक तीन वर प्रत्यक्ष उपचाराला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 18 रुग्ण येथे दाखल झाले आहेत.Treatment of corona patients started at nandurbar railway station

रुग्णांना वाढत्या तापमानामुळे त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व रेल्वे विभागाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात आली आहे. रेल्वेच्या डब्यावर गोणपाट टाकून पाणी दिले जात आहे. तर प्रत्येक कोचमध्ये कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी 24 तास डॉक्टर्स, सुरक्षा रक्षक व शिक्षकांची झोनल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनाही नेहमी प्रवास करणाऱ्या रेल्वेतून रुग्णांना सेवा देताना आनंद वाटत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून डॉक्टर्स, मेडिसिन व कर्मचारी उपलब्ध करून रुग्णांना जेवण, चहा व उपचार मोफत दिले जात आहे. तर कोचची साफसफाई, पाणी, सुरक्षा आदी सुविधा रेल्वे विभागाद्वारे केल्या जात आहे. कोरोना महामारी संकटाला लढा देताना रेल्वे स्थानकात राहून उपचार देणाऱ्या डॉक्टरांचे व  प्रशासनाचे रुग्णांनी आभार मानले आहे. त्याच बरोबर रेल्वेतून उपचार घेताना आमच्या जीवनातील हा एक वेगळा अनुभव असल्याची डॉक्टर व रुग्णांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Edited by - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live