धक्कादायक : हदगाव कोव्हिड सेंटरमध्ये मृतदेहा शेजारीच रुग्णांवर उपचार (पहा व्हिडिओ)

संतोष जोशी
गुरुवार, 15 एप्रिल 2021

एक मृतदेह  बेडवर कपड्यात गुंडाळून ठेवलेला आणि एकजण नुकताच मृत झाला आहे. मृतदेहाच्या बाजूलाच रुग्ण उपचार घेत आहे. हे दाखवणारा व्हिडिओ स्वतः रुग्णाच्या नातेवाईकांनी व्हायरल केला आहे

नांदेड: नांदेड Nanded जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे कसे तीन तेरा वाजलेत. आणि रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेने गाठलेला कळस. एक मृतदेह  बेडवर कपड्यात गुंडाळून ठेवलेला आणि एकजण नुकताच मृत झाला आहे. मृतदेहाच्या बाजूलाच रुग्ण उपचार घेत आहे. हे दाखवणारा व्हिडिओ स्वतः रुग्णाच्या नातेवाईकांनी व्हायरल केला आहे. Treatment of patients sitting next to corpses at Hadgaon covid Center

एकीकडे प्रशासन सांगत आहे की, कोरोना रूग्णांसाठी प्रशासन सज्ज आहे. मात्र दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या District Administration दाव्याचे पोलखोल करणारे वास्तव स्वतः रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक पुढे आणत आहेत. काल पासून हदगाव Hadgaon येथील कोव्हिड सेंटर Covid Center मधील एका रुग्णाच्या नातेवाईकांनी एका व्हिडिओ Viral video च्या माध्यमातून भयान वास्तव समोर आणलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगाचा थरकाप उडाल्या शिवाय राहणार नाही.

या व्हिडिओत एक मृतदेह Dead body बेडवर कपड्यात गुंडाळून ठेवलेला आणि एकजण नुकताच मृत झाला आहे. मृतदेहाच्या बाजूलाच इतर अनेक रुग्ण उपचार घेत आहे. हे पाहुन कुणाच्या ही काळजात धडकी भरल्या शिवाय राहणार नाही. या ठिकाणी आजूबाजूला घाणीचे साम्राज्य ही पसरलेलं दिसत आहे. हदगाव च्या कोव्हिड सेंटर मधील  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आणि चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे. 

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live