जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत धुळ्यात वृक्षारोपण

भूषण अहिरे
शनिवार, 5 जून 2021

जागतिक  पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वनविभाग व विधीसेवा प्राधिकरण तसेच धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे एकत्रितरित्या धुळे शहरातील विविध भागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे.

धुळे : जागतिक  पर्यावरण दिनाचे World Environment Day औचित्य साधत वनविभाग व विधीसेवा प्राधिकरण तसेच धुळे महानगरपालिका Dhule Municipal Corporation प्रशासनातर्फे एकत्रितरित्या धुळे शहरातील विविध भागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड Tree planting करण्यात आली आहे. Tree planting in Dhule on the occasion of World Environment Day

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच कोरोनाच्या Corona काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. याचे महत्व पटवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्रशासनाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे.

3 वर्षावरील मुलांना लसीकरणाची मान्यता देणारा चीन ठरला पहिला देश

जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या निवास परिसरात देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे आहे. यावेळी वनविभाग त्याचबरोबर धुळे महानगरपालिका व विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील पहा - 

या उपक्रमात आज तब्बल दीडशेहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. यापुढे देखील संपूर्ण पावसाळाभर Monsoon हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live