भोर मतदारसंघात तिरंगी लढत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे : भोर मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भोर मुळशी मतदारसंघात भाजपचे नगरसेवक किरण दगडे हे बंडखोरी करणार आहेत. ही जागा सेनेला सुटली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी ही जागा भाजपला मिळावी म्हणून प्रयत्न केलं होते. मात्र, काँग्रेसकडून संग्राम थोपटे व सेनेकडून कुलदीप कोंडे हे उमेदवार असतील मात्र भाजपकडून बंडखोरी अटळ आहे. यात शंका नाही. भोर विधानसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी कुलदीप कोंडे यांना जाहिर झाली आहे.

कुलदीप कोंडे हे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सन 2014 मध्येही ते भोर विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढले होते. संग्राम थोपटे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. यंदाही शिवसेनेने त्यांना संधी देऊन निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.

भोर विधानसभेच्या पुनःर्चरनेनंतर सन 2009 पासून आमदार संग्राम थोपटे हे कॉंग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडून आले आहेत. सलग दोनदा आमदार असल्याने संग्राम थोपटे दुर्गम असलेल्या भोर मतदारसंघात गावागावात परिचित असलेले उमेदवार आहेत. अशातच त्यांचे भाेर नगरपरिषद व वेल्हे पंचायत समिती यावर निर्विवाद वर्चस्व आहे.

मुळशी तालुक्यात एकही पंचायत समिती सदस्य वा जिल्हा परिषद सदस्य नसला तरी कॉंग्रेसचे मतदान हे दाेन आकड्यांमध्ये निश्चित झाले आहे. तसेच केलेल्या विकासकामांमुळे थोपटे यांच्याकडे मुळशीतील नागरिकांचा ओढाही वाढला आहे. मागील दोन वेळेपेक्षा कोणत्याही परिस्थितीत अधिक मतदान थोपटे घेणार, यात विरोधकांनाही शंका नसेल. त्यामुळे कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

भाजपने नगरसेवक किरण दगडे यांना मैदानात उतरवलं आहे. मुळशीमध्ये दगडे यांना मानणारा वर्ग आहे. मुळशीवर आधारित मुळशी पॅटर्न या  चित्रपटाचे दगडे निर्माते आहेत. त्यांची पत्नी बावधनच्या सरपंच आहेत. आणि शहातील अनेक भाग या मतदारसंघात जोडला गेला आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्न या चित्रपटाप्रमाणे या लढतीत देखील रंगत वाढेल, यात शंका नाही

Web Title: Triangular contesting in Bhor constituency

संबंधित बातम्या

Saam TV Live