लसीकरणाची भीती दूर करण्यासाठी आदिवासी तरुणाने अनोखा प्रयत्न

भूषण अहिरे
सोमवार, 31 मे 2021

सुभाष पावरा या आदिवासी तरूण शिक्षकाने हाती घेतलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

कोरोनाला (Coronavirus) अटकाव घालण्यासाठी शासनातर्फे नागरीकांमध्ये लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून या जनजागृतीमुळे शहरातील कोरोना आटोक्यात तर आला आहे. परंतु अद्यापही ग्रामीण भागात लसीकरण (Vaccination) संदर्भात नागरिकांच्या मनामध्ये भीती असल्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला पाहिजे तितकं यश अद्यापही आलं नाहीये. आणि हेच बघता आदिवासी भागातील एक तरुण शिक्षक आदिवासी नागरिकांच्या मनातील लसीकरणा संदर्भातील भीती दूर करण्यासाठी अक्षरशहा भर उन्हात उपाशी सायकलवर डोंगराळ भागांमध्ये पोहोचून आदिवासी नागरिकांच्या मनातील लसीकरणा संदर्भातील भीती आपल्या आदिवासी बोलीभाषेतून दूर करण्याचा अनोखा प्रयत्न करीत आहे.(Tribal youth launched a unique effort to overcome the fear of vaccination)

संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यानंतर आता लसीकरणावर प्रशासनाने जोर दिला आहे. आणि त्यामुळेच लसीकरण करून घेण्यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. परंतु प्रशासनातर्फे लसीकरणासाठी जनजागृती करून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत तरीही आदिवासी बांधवांमध्ये लसीकरण संदर्भात पसरलेले गैरसमज बघता आदिवासी बांधव लसीकरणापासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच लसीकरण आदिवासी भागात कमी प्रमाणात झाल्यामुळे शहरी भागातील कोरोना हा आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे परंतु ग्रामीण भागात कोरोना अद्यापही कमी झाल्याचे दिसून येत नाहीये. याच मुख्य कारण म्हणजे लसीकरणा संदर्भात नागरिकांच्या मनामध्ये चुकीची पसरलेली अफवा. आणि हीच अफवा दूर करीत नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणा संदर्भात बसलेली भीती दूर करण्यासाठी शिरपूर तालुक्यातील सुभाष पावरा हा आदिवासी तरुण शिक्षक सायकलवर भर उन्हात उपाशी खेडोपाडी पोहोचून नागरिकांच्या मनामधली भीती दूर करण्याचा अनोखा प्रयत्न करीत आहे.

हे देखील पाहा

सुभाष पावरा हे शिरपूर तालुक्यातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेमध्ये मैदानी खेळाचे प्रशिक्षक म्हणून काम बघतात. परंतु, कोरोनाच्या संकट काळामध्ये आदिवासी बांधवांच्या मनामध्ये लसीकरण संदर्भात बसलेली भीतीच त्यांच्या मृत्यूला कारण ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर या आदिवासी तरूण शिक्षकाने स्वतः वाहनावरून फिरून जनजागृती करणं आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्यामुळे सायकल वर आदिवासी डोंगराळ भागात नागरिकांच्या मनातील लसीकरणा संदर्भातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

दगडाला देव बनवणाऱ्या हाताला दोन घासाची प्रतीक्षा

सुभाष पावरा या आदिवासी तरुणाने गेल्या काही दिवसांपासून ही जनजागृती मोहीम सुरू केली असून जनजागृती मोहीम सुरू करण्याआधी पावरा यांनी स्वतः लसीकरण करून घेतले व त्याचे छायाचित्र आपल्या सायकलच्या पुढील भागामध्ये मोठ्या स्वरूपात लावून नागरिकांना लसीकरण संदर्भात महत्त्व पटवून देताना पहिले आपणच लसीकरण करून घेतले आहे हे पटवून देतात आणि त्यानंतर कोरोणाच्या या संकट काळामध्ये लसीकरणाचे कशा पद्धतीने महत्त्व आहे हे आदिवासी बांधवांना आपल्या आदिवासी बोलीभाषेमध्ये समजून सांगतात.

पूर्व विदर्भातील धानाच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर आरोप 

सुभाष पावरा या आदिवासी तरूण शिक्षकाने हाती घेतलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. सुभाष पावरा यांच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसून येत असून आदिवासी नागरिकांच्या मनातील भीती हळूहळू दूर होत असल्यामुळे नागरिकांचे पाय आता लसीकरणा कडे वळू लागले आहेत. सुभाष पावरा या आदिवासी तरुण शिक्षका प्रमाणे इतर तरुणांनी देखील प्रशासनाच्या मदतीसाठी जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. तेव्हाच ग्रामीण भागातील कोरोनाला अटकाव घालणं शक्य होणार आहे.

Edited By : Pravin Dhamale


संबंधित बातम्या

Saam TV Live