ट्रकचा टायर फुटल्याने कांद्याने भरलेला ट्रक थेट पुलाखाली

भूषण अहिरे
रविवार, 2 मे 2021

पहाटेच्या दरम्यान शिरपूर जवळ सावळदे फाट्या लगत असलेल्या पुलावरून कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाला. टायर फुटल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने तापी नदी ओलांडल्यानंतर ट्रकचा टायर फुटल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालक व वाहक हे दोघेही गंभीर जखमी झाले असून जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याची बातमी गावामध्ये पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अक्षरशहा कांद्यावर हात साफ केला आहे.

धुळे - आज पहाटेच्या दरम्यान शिरपूर Shirpur जवळ सावळदे फाट्या लगत असलेल्या पुलावरून कांद्याने Onion भरलेला ट्रक पलटी झाला. टायर Tire फुटल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने तापी नदी tapi river ओलांडल्यानंतर ट्रकचा टायर फुटल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक Truck चालक व वाहक हे दोघेही गंभीर जखमी झाले असून जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये Hospital पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याची बातमी गावामध्ये पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अक्षरशहा कांद्यावर हात साफ केला आहे. truck accident in dhule 

ग्रामस्थांनी वाहनातील अस्ताव्यस्त पडलेल्या कांदा वाहनांमध्ये भरून पळविला. ग्रामस्थांनी नुसता कांदाच पळविला नाही तर वाहनातील ताडपत्री तसेच दोरखंड देखील पळवण्यास मागेपुढे बघितले नाही. ग्रामस्थांना या दुर्घटनेचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे या संपूर्ण  प्रकारावरून दिसून आले आहे. या दुर्घटनेत देखील ग्रामस्थांनी संधी साधत कांद्याची पळवा पळवि केल्यानेच दिसून आले आहे. दरम्यान, ट्रक चालक व वाहक या दोघांवर शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचार सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live