लॉकडाऊनला वैतागून ट्रक ड्रायव्हरची आत्महत्या !

Truck driver commits suicide due to lockdown
Truck driver commits suicide due to lockdown

लातूर : सततच्या लॉकडाऊनला Lockdown वैतागून आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने एका विवाहित ट्रक ड्रायव्हरने गावातील मुख्य चौकातील विहिरीत उडी मारून आत्महत्या Suicide केल्याची दुर्दैवी लातूर Latur जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रूक या गावात घटना घडली आहे. Truck driver commits suicide due to lockdown

निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथील ३२ वर्षीय खंडू तात्येराव डोंगरे या विवाहित तरूण ट्रक ड्रायव्हरने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. म्हणून विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या चौदा महिन्यापासून कोरोनासारख्या Corona संसर्गजन्य रोगामुळे राज्यसह देशात रूग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या लोकांना आपले कुटुंब जगवावे कसे हा मोठा प्रश्न डोंगरासारखं समोर उभा होता.

गेल्या एका वर्षापासून कामधंदा नसल्यामुळे व ट्रकमालकाची गाडी बसून असल्याने सदरील ट्रकमालकाने गाडीवरून काढून टाकले होते. यामुळे व्यक्तीने वैतागून व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली म्हणून गावातील  विहिरीत उडी मारून पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटना घडली असून आपल्या सहा महिन्याच्या मुलीच्या -हदयाला छिद्र असल्यामुळे ती आजारी होती. गरीब परिस्थितीमुळे दवाखाने करणेही अवघड झाले होते. Truck driver commits suicide due to lockdown

लॉकडाऊन पडल्याने ट्रक मालकाने गाडीवरून काढून टाकल्यामुळे घर चालवणे व मुलीचा दवाखाना करणे या सर्व गोष्टीला वैतागून या तरूण विवाहित खंडूने आपला जीव दिला आहे. असे त्याचे वडील तात्येराव डोंगरे यानी सांगितले. मयत व्यक्ती पश्चात आई वडील पत्नी एक सहा महिण्याचे लहान बाळ भाऊ भावजया असा परीवार आहे.


Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com