भारत-पाकचे संबंध सुधारवण्यास ट्रम्प तयार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

 

 

न्यूयॉर्क : अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेसोबत जाण्याची घेतलेली भूमिका ही सर्वांत मोठी घोडचूक होती, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी दिली. यापूर्वीच्या सरकारांनी त्यांना जे शक्य नव्हते, ते करण्याची ग्वाही द्यायला नको होती, असे इम्रान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र म्हणून संबोधल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 'पाकिस्तान आणि भारताची तयारी असेल, तर काश्मीर प्रश्नावर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे,' असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या मध्यस्थीसाठी मात्र दोन्ही देशांची सहमती असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

'मी स्वत: उत्तम मध्यस्थ असून, माझी मदत करण्याची तयारी आहे. काश्मीर प्रश्न गुंतागुंतीचा असल्याने मी ही तयारी दर्शवली आहे,' असेही ट्रम्प म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट झाली. त्या वेळी ट्रम्प यांनी मध्यस्थीचा सूर पुन्हा आळवला.

Web Title : Trump ready to improve Indo-Pak relations
 


संबंधित बातम्या

Saam TV Live