बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांचा सेनेला डिवचण्याचा प्रयत्न, राऊतांचंही प्रत्यूत्तर

साम टीव्ही
शनिवार, 23 जानेवारी 2021

बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांकरिता अत्यंत स्फूर्ती देणारं, प्रेरणादाई व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे ज्याठिकाणी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव येईल त्याठिकाणी संघर्षाला उभे राहू, त्यांच्या बाजूने उभे राहू असं फडणवीस म्हणालेत. दरम्यान, बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीसांनी आपल्या जुन्या मित्राला, म्हणजेच शिवसेनेला टोला हाणलाय. 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट करून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय. बाळासाहेबांच्या भाषणातील काही विधान असलेला भाषणांचा या व्हिडिओत समावेश आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून स्वाभिमानावरून फडणवीसांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांकरिता अत्यंत स्फूर्ती देणारं, प्रेरणादाई व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे ज्याठिकाणी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव येईल त्याठिकाणी संघर्षाला उभे राहू, त्यांच्या बाजूने उभे राहू असं फडणवीस म्हणालेत. दरम्यान, बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीसांनी आपल्या जुन्या मित्राला, म्हणजेच शिवसेनेला टोला हाणलाय. 

पाहा व्हि़डिओ काय म्हटले फडणवीस : 

"अलीकडच्या राजकारणात आपण पाहतो, खूप वेळा नेत्यांची मने छोटी छोटी होतात, ते आपल्या पलीकडे पाहू शकत नाही. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. जे चैतन्य बाळासाहेब तयार करायचे, ते मात्र फारच अप्रतिम असायचं. निवडणूक हरो किंवा जिंको, पण बाळासाहेब येऊन गेल्यावर जिंकल्याची खरी मजा यायची. ही बाळासाहेबांमध्ये  खऱ्या अर्थाने ताकद होती. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे यांनी आपल्यामध्ये जे बीजारोपण केलं ते राष्ट्रीयत्वाचं बीजारोपण केलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. 'ते' कुठेही असले आणि 'आम्ही' कुठेही असलो तरीही आमच्याकरता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे निश्चितपणे आदरस्थानीच राहतील. ज्याठिकाणी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव येतील त्याठिकाणी संघर्षाला उभे राहू, त्यांच्या बाजूने उभे राहू.. त्यांच्या विचारांकरता उभे राहू. तुम्ही मिसळ केली असेल त्यांच्या विचारात. मात्र आम्ही केलेली नाही, असं फडणवीस म्हणालेत.

याला संजय राऊतांनीही प्रत्यूत्तर दिलंय - 

फडणवीसांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला शिवसेनेनं कधीच छेद दिला नाही असं राऊत यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live