Twitter चा डेटा लीक! ट्विटर युजर्सना सुचना

साम टीव्ही न्यूज
रविवार, 22 डिसेंबर 2019

 Twitter चा डेटा लीक करण्यात आलाय,त्यामुळे ट्विटर युजर्सना सुचना देण्यात आल्यात.  ‘ट्विटर अ‍ॅपमध्ये मॅलिशिअस कोड इंजेक्ट करण्यात आले होते, त्याद्वारे युजर्सची वैयक्तीक माहिती मिळवता येणेही शक्य होते. गेल्या शुक्रवारी याचा परिणाम भारतासह जगभरातील ट्विटर युजर्सच्या अकाउंटवर दिसून आला होता’, हे मान्य करत ट्विटरने आपल्या युजर्सना तातडीने अँड्रॉइड अ‍ॅप अपडेट करण्याची सूचना  ट्विटर युजर्सना देँण्यात आली आहे. डेटा चोरीचे काही पुरावे मिळालेत की नाही याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही

ट्विटरकडून युजर्सना मेल पाठवून अँड्रॉइड अ‍ॅप तात्काळ अपडेट करण्याची सूचना करण्यात आली आहे. अ‍ॅपमधील त्रुटी दूर करण्यात आली आहे. तसंच युजर्सना इमेलद्वारे नोटिफिकेशन्स देऊन त्यांना अ‍ॅप अपडेट करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती ट्विटरने दिली. मात्र, याचा किती युजर्सना फटका बसलाय, याची माहिती दिलेली नाही. याशिवाय iOS वेब युजर्सना याचा फटका बसलेला नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Twitter Security Warning Twitter Warns Indian Users About Data Breach 

संबंधित बातम्या

Saam TV Live