VIDEO | काँग्रेसच्या बैठकीदरम्यानच ट्विटरवॉर, पाहा काँग्रेस नेत्यांचे पक्षावरचे ताशेरे

साम टीव्ही
सोमवार, 24 ऑगस्ट 2020
  • काँग्रेसच्या बैठकीदरम्यानच ट्विटरवॉर
  • ट्वीट करत सिब्बलांची राहुल गांधींवर टीका
  • गुलाम नबी आझादांनी राजीनामा देऊ केला
  • सिब्बल यांनी काहीच वेळात ट्वीट मागे घतेलं

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा सोनियांचीच निवड झालीय. खरं तर राहुल गांधीच्या नावाचा प्रस्ताव मांडला गेला होता. अहमद पटेल यांनी हा ठराव मांडला होता. मात्र त्यावर निर्णय न झाल्याने काँग्रेसचे अतंरिम नवे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा सोनिया गांधींचीच निवड करण्यात आलीय. सहा महिन्यांसाठी अंतरिम अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच असेल.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यानच ट्विटरवॉर पाहायला मिळालं. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद भडकले. ज्या नेत्यांनी यावेळी पत्र लिहिलंय त्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केलेली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी लावल्याची माहिती समोर येतेय. या आरोपानंतर गुलाम नबी आझाद यांनी थेट राजीनामा देत असल्याचं म्हटलं. तर कपिल सिब्बल यांनी बैठकीतूनच ट्वीट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. आश्चर्य म्हणजे कपिल सिब्बल यांनी थोड्याच वेळात हे ट्वीट डिलीट सुद्धा केलंय. तर दुसरीकडे आपलं ट्विट राहुल गांधींसाठी नव्हतं, तर ते दुसऱ्या लोकांसाठी होतं असं स्पष्टीकरण गुलाम नबी आझाद यांनी दिलंय.  एकूणच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत यंग ब्रिगेड विरुद्ध ओल्ड़ ब्रिगेड असा सामना पाहायला मिळतोय.

बघुयात राहुल गांधी यांनी काय आरोप लावले. आणि त्यावर सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी काय ट्विट केलं होतं. 


संबंधित बातम्या

Saam TV Live