बनावट नोटांप्रकरणी दोन आरोपींना अटक

सूरज सावंत
मंगळवार, 1 जून 2021

ज्या मध्ये ५०० आणि २०० च्या नोटांचा समावेश आहे.

मुंबईत कोरोनाच्या काळात बाजारात बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना एटीएसने अटक केली आहे. या आरोपींकडून एटीएसने तब्बल दीड लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ज्या मध्ये ५०० आणि २०० च्या नोटांचा समावेश आहे. या नोटांची तस्करी करण्यासाठी आरोपी हे मालाड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. सलमान अज्जाज खान  २३, अब्दुल कादरी खान २३ अशी या दोघांची नावे असून यांचा साथीदार फरार आरोपी आकाश गौड याचा एटीएसचे पोलिस शोध घेत आहेत. न्यायालयाने आरोपींना ७ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Two accused arrested in counterfeit notes case)

हे देखील पाहा

दरम्यान, कोरोनाच्या काळात तरुण चांगल्या कामात रुग्णांच्या सेवा करण्यात आपले जीवन घालवत आहेत. त्याचबरोबर, काही तरुण खून, तलवारी नाचवणे, मोठ्या मोठ्या मिरवणूक काढत आहेत. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी घोटकोपरमध्ये हनी ट्रॅपची घटना घडली होती. त्यातच आता बनावट नोटांप्रकरणी २ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   


संबंधित बातम्या

Saam TV Live